Maratha Karja Yojana अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजनेबद्दल संपूर्ण माहिती: पहा अर्ज, पात्रता व आवश्यक कागदपत्रे…

कर्ज साठि अर्ज कसा करावा?

  • रोजगार व स्वंयरोजगार मार्गदर्शन केंद्रात नोंदणी आवश्यक आहे. नोंदणी नसल्यास, नोंदणी करावी लागेल.
  • सदर रोजगार नोंदणी क्रमांक पुढील रकान्यात टाकावा.
  • आपला प्रोफाईल डेटा दिसेल(प्रोफाईल फोटो नसेल तर अपलोड करा.)
  • उपलब्ध असणाऱ्या योजना पाहता येतील.
  • निवडलेल्या योजनेला अप्लाय केल्यास संबंधित अर्ज उपलब्ध होईल.
  • अर्जा मध्ये माहिती भरून तो पूर्ण करावा त्यानंतर आवश्यक ती कागद पत्रे अपलोड करावीत.
  • पूर्ण केलेल्या अर्जानंतर online अथवा offline पद्धतीने अर्ज शुल्क (फॉर्म फी रु. ५०) भरणा करावा.
  • Offline पद्धतीने अर्ज सादर केल्यास जिल्हा कार्यालयात फॉर्म फी रु. ५० चा भरणा करावा व शुल्क भरल्याची पावती online अपलोड करावी.
  • ज्या तारखेस फॉर्म फी ची भरणा केली जाईल त्या तारखेपासून कर्ज अर्जावर कार्यवाही करण्यात येईल.

कर्ज मंजुरीची कार्यपद्धती आणि अर्ज मंजूरीचे टप्पे कोणते?

  • अर्जदाराने ऑनलाईन पद्धतीने सादर केलेल्या  https://udyog.mahaswayam.gov.in/#/home  या साईट वर अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावीत. अर्ज सादर केल्यानंतर अर्जदारास सिस्टीम द्वारे SMS व email येईल .
  • स्थळ पाहणीसाठी लाभार्थी वेबपोर्टलद्वारे दिनांक व वेळ स्वतः निश्चित करेल त्यानुसार संबधीत जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार कार्यालया मार्फत प्रस्तावित व्यवसायाच्या जागेची, वास्तव्याच्या स्थळाची पाहणी तसेच जामीनदाराची पडताळणी करण्यात येईल.
  • सादर केलेल्या कर्ज प्रकरणाचा प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर बँकेकडे पाठवण्यात येतो.
  • बँकेने कर्ज मंजुरी आदेश दिल्यानंतर कर्ज प्रकरणाची फाईल आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून महामंडळाकडे मंजुरीकरिता पाठवण्यात येते.
  • महामंडळाकडून कर्ज प्रकरण मंजुरी केल्यानंतर मंजुरी आदेश अर्जदारास सिस्टीम द्वारे (SMS व email) प्राप्त होईल. त्यानंतर अर्जदाराकडून वैधानिक कागदपत्राची पूर्तता करून घेण्यात येईल.
  • त्यानंतर महामंडळाकडून बीज भांडवलाच्या रकमेचा धनाकर्ष (डीडी) जिल्हा कार्यालयाकडे पाठवण्यात येतो व त्याची माहिती लाभार्थ्याला सिस्टीम द्वारे (SMS व email) देण्यात येते.
  • महामंडळाकडून प्राप्त झालेले बीज भांडवल आणि बँकेने मंजूर केलेली कर्जाची रक्कम एकत्रितपणे अर्जदाराच्या बँक खाती जमा करण्यात येते.
  • कर्जाची पूर्ण परतफेड झाल्यावर लाभार्थ्यास त्यासंबंधीचे प्रमाणपत्र, ई–मेल वर येईल.

पत्ता :

  • अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, जी. टी हॉस्पिटल कंपाऊंड, बद्ड्रुद्दीन तय्यबजी मार्ग, जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्स मागे, मुंबई 400 001.
  • दूरध्वनी. 22657662,
  • फॅक्स क्रमांक.22658017
  • ईमेल: apamvmmm@gmail.com

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

  1. REC Recruitment REC लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू…
  2. CRPF Recruitment केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये 9212 पदांसाठी मेगा भरती सुरू…
  3. High Court Recruitment मुंबई उच्च न्यायालयामार्फत नवीन भरती सुरू…
  4. CBI Recruitment सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये मेगा भरती सुरू!!!
  5. RBI Bharti रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये भरती सुरू!!!

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top