संजय गांधी निराधार (Sanjay Gandhi Niradhar) अनुदान योजना

Sanjay Gandhi Niradhar Yojana
Sanjay Gandhi Niradhar Yojan
Sanjay Gandhi Niradhar Yojan

महाराष्ट्र शासनाचे निराधार वृद्ध व्यक्ती अंध, अपंग, शारिरीक व मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती व निराधार विधवांना अर्थसहाय्य देण्याच्या मूळ हेतूने १८ सप्टेंबर १९८० च्या परिपत्रकानुसार संजय गांधी निराधार अनुदान योजनेची सुरुवात १९८० साली करण्यात आली.

शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडील निर्णय दिनांक ३० सप्टेंबर २००८ अन्वये १. संजय गांधी निराधार / आर्थिक दुर्बलांसाठी अनुदान योजना व २. इंदिरा गांधी निराधार व भूमिहीन शेतमजूर महिला अनुदान योजना या दोन्ही योजना एकत्रित करुन संजय गांधी निराधार अनुदान योजना मंजूर करण्यात आली आहे.

त्या योजनेसाठीचे निकष, अनुदान याबाबतचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.

पात्रतेचे निकष

  • किमान १५ वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहीवासी असावा.
  • शासनाचे एखाद्या वित्त संस्थेने, धर्मादाय संस्थेने किंवा प्राधीकरणाने चालविलेल्या कोणत्याही संस्थेची किंवा निवासाची अंतर्वासी नसावा.
  • ६५ वर्षापेक्षा कमी वयाचे स्त्री / पुरुष व्यक्ती या नियमानुसार आर्थिक मदत मंजूर केली जाण्यास पात्र समजण्यात येईल.

पात्र व्यक्तींचे प्रकार

  • अपंगातील अस्थिव्यंग, अंध, मुकबीर, कर्णबधीर, मतिमंद इत्यादी प्रवर्गातील स्त्री / पुरुष
  • तसेच क्षयरोग, कर्करोग, एड्स, कृष्ठरोग यासारख्या दुर्धर शारिरीक व मानसिक आजारामुळे स्वतःचा चारितार्थ चालवू न शकणारे ६५ वर्षापेक्षा कमी वयाचे निराधार स्त्री पुरुष
  • निराधार महिला, निराधार विधवा, घटस्फोट प्रक्रीयेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळणा-या किंवा या योजनेखाली विहित केलेलया उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी पोटगी मिळणा-या महिला, अत्याचारित महिला व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला.
  • शेतमजूर महिला
  • आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न या योजनेखाली विहित केलेल्या उत्पन्नापेक्षा कमी असल्यास आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या विधवा असणे आवश्यक आहे.
  • १८ वर्षाखालील अनाथ मुल कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न प्रतीवर्षी रु. २१,०००/- पर्यंत असणे आवश्यक आहे.
हे वाचले का?  7/12 (Satbara Utare) उतारे पोट-हिश्याचे ही आता स्वतंत्र होणार

संजय गांधी निराधार अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे :

१. वयाचा दाखला: ग्रामपंचायत किंवा नगरपालीकच्या / म.न.पा. च्या जन्म नोंदवहीतील उता-याची सांक्षांकित प्रत, शाळा सोडल्याचा दाखला, शिधापत्रिकेवरील अथवा निवडणूक मतदार यादीत नमूद केलेल्या वयाबाबतचा उतारा,शिधापत्रिकेची साक्षांकित प्रत किवा ग्रामिण / नागरी रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक यांचा किंवा त्यापेक्षा वरील शासकीय वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेला बयाचा दाखला.

२. अपंगाचे प्रमाणपत्र: अस्थिव्यंग, अंध, मुकबधीर, मतिमंद यांचे अपंगत्वाबाबत अमंगव्यक्ती अधिनियम १९९५ च्या तरतुदीप्रमाणे जिल्हा शल्य चिकित्सक यांचे ४०% अपंगत्व असल्याबाबतचे प्रमाणपत्र.

३. असमर्थतेचा रोगाचा दाखला: जिल्हा शल्य चिकित्सक, शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक यांनी दिलेला दाखला.

४. उत्पन्नाचा दाखला: तहसिलदार किंवा उपविभागिय अधिकारी यांनी दिलेला दाखला किंवा दारिद्रय रेषेखालील यादीमध्ये त्या व्यक्ती किंवा कुटूंबाचा समावेश असल्याबाबतचा साक्षांकित उतारा

५. रहिवासी दाखला: ग्रामसेवक / तलाठी / मंडळ निरीक्षक / नायब तहसिलदार किंवा तहसिलदार अथवा कोणत्याही न्यायालयाने दिलेला रहिवासी असल्याबाबत दाखला.

६. कोणत्याही सरकारी किंवा निमसरकारी किंवा निवासगृहाचा आंतरवासी नसल्याबाबतचा दाखला: तहसिलदार किंवा ग्रामसेवक / तलाठी यांच्या शिफारशीवरून दिलेला दाखला व महिला बाल कल्याण अधिकारी यांनी दिलेला दाखला.

७. अनाथ असल्याचा दाखला: ग्रामसेवक / मुख्याधिकारी / प्रभाग अधिकारी यांनी दिलेला व गटविकास अधिकारी / प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांनी साक्षांकित केलेला दाखला.

हे वाचले का?  ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी व उपाय करता नवीन ‘शरद शतम्’ योजना

संजय गांधी निराधार मिळणारे अनुदान

वरीलप्रमाणे अटींची पूर्तता करणा-या एक व्यक्ती निराधार कुटुंबाला संजय गांधी निराधार मिळणारे अनुदान दरमहा १००० /- एवढे अर्थसहाय्य अनुज्ञेय आहे.

नवनवीन माहिती

संजय गांधी निराधार अर्ज करण्याची पद्धत

१. या योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळण्यासाठी विहित नमुन्यामधील अर्जाच्या दोन प्रती अर्जदार ज्या भागात रहात असेल त्या भागाच्या संबंधीत तलाठ्याकडे अर्ज सादर करील. तलाठी सदर अर्जदारास पोच देईल. त्यानंतर प्राप्त अर्जाची व त्या सोबतच्या कागदपत्राची पडताळणी करून अर्ज संबंधीत तलाठी यांनी तहसिलदार / नायब तहसिलदार यांचेकडे पाठवावे.

२. संबधीत तहसीलदार अथवा नायब तहसीलदार यांच्याकडे आलेले अर्ज प्राप्त तारखेनुसार लावण्यात यावेत व याची एका नोंदवहीत नोंदणी क्रमांकासह नोंद घेण्यात यावी.

३. आलेल्या अर्जांची छाननी करुन नायब तहसिलदार / तहसिलदार यांनी सदर अर्ज तालुकास्तरावरील विधानसभा सदस्य यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीसमोर मान्यतेस्तव दर तीन महिन्यात ठेवावीत.

४. प्राप्त झालेल्या अजांची छाननी समितीने करावी व छाननी नंतर लाभार्थ्याची निवड समितीने करावी अशी निवड झाल्यानंतर पात्र व अपात्र लाभार्थ्यांची यादी सूचना फलकावर प्रसिद्ध करावी.

५. अर्ज मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना कळवावे व ज्यांचे अर्ज नामंजूर झाले अशा अपात्र लाभार्थ्यांना कारणासह कळवावे. सदर लाभाथ्र्यांची यादी ग्रामसभा, प्रभाग संस्थेला माहितीसाठी पाठवावी. तसेच पात्र व अपात्र अर्जदारांची यादी ग्रामपंचायतीच्या व प्रभाग कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात यावी.

हे वाचले का?  फळ पिक विमा योजना Pradhanmantri Phal Pik vima Yojana

सदर यादीचे वाचन ग्रामसभेत व प्रभाग कार्यालयात करावे. ग्रामसभेने व प्रभाग कार्यालयाने काही व्यक्तींची चूकीची निवड झाली आहे असे पुराव्यासह कळविल्यास असे अर्ज पडताळणी करून समिती समोर फेरविचारार्थ ठेवावेत.

निधीचे वितरण

नव्याने मंजूर करण्यात आलेल्या प्रकरणांची माहिती दर तिमाहीस शासनास कळवावी. नवीन लाभार्थ्याना लागणारा निधी शासनाकडून प्राप्त झाल्यानंतरच त्यांनी लाभ देण्यात यावा.

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा

1 thought on “संजय गांधी निराधार (Sanjay Gandhi Niradhar) अनुदान योजना”

  1. Pingback: मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना महाराष्ट्र सरकार राबविणार - माहिती असायलाच हवी

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.