“मृत्युपत्र म्हणजे मृत्युपत्र करणार्या व्यक्तीने, त्याच्या मृत्युनंतर त्याच्या मालमत्तेची विल्हेवाट कशी लावावी यासंबंधीची कायदेशीर पध्दतीने घोषित केलेली इच्छा होय’’
भविष्यात आपल्याच वारसदारांमध्ये भांडणे होऊन त्यांचे संबंध बिघडू नयेत म्हणून मृत्युपत्र करणे केव्हाही चांगले.
माणूस मयत झाल्यावर त्याच्या संपत्तीची त्याच्या इच्छेप्रमाणे विभागणी करण्याचे काम Death Will करते.
– भारतीय वारसा कायदा, १९२५. – भारतीय वारसा कायदा १९२५, भाग ६ मध्ये कलम ५७ ते १९० अन्वये मृत्युपत्राबाबत (Death Will) तरतुदी दिलेल्या आहेत.
– भारतीय वारसा कायदा १९२५, कलम- २ (एच) अन्वये मृत्युपत्राची व्याख्या दिली आहे. – भा. वा. कायदा १९२५, कलम ५७ म्हणजे हिंदू विल्स एक्ट
नाही. Death Will साध्या कागदावरही करता येते. मृत्युपत्र स्टँप पेपरवरच केलेले असावे असे कोणतेही बंधन नाही.
नाही. मृत्युपत्र नोंदणीकृत असावे असे कोणतेही बंधन कायद्यात नाही.
नोंदणी कायदा, १९०८, कलम ४२ अन्वये मृत्युपत्र, सील करुन दुय्यम निबंधकाकडे जमा करता येते. याला Deposited Will म्हणतात.
– Death Will करणारी व्यक्ती वयाने सज्ञान असावी तसेच मानसिकदृष्ट्या सुदृढ असावी, ती दिवाळखोर नसावी.
मुक किंवा बधीर किंवा अंध व्यक्ती, जर त्यांना परिणामांची जाणीव असेल तर, मृत्युपत्र करु शकतात.
हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६, कलम ३० अन्वये हिंदू व्यक्तीला एकत्र कुटुंबाच्या मिळकतीमधील स्वत:च्या हिश्शाबाबत मृत्युपत्र करता येते.