पोलीस लाठीचार्ज: किती कायदेशीर, किती बेकायदेशीर ?

याचं उत्तर आहे हो,

 पोलीस (लाठीचार्ज करण्याचे नियम पाळून) लाठीचार्ज करू शकतात. असा लाठीचार्ज कायदेशीर असतो

पण याचं पुढचं उत्तर आहे. पोलीसांनी लाठीचार्ज करण्यांचे नियम मोडून केलेला लाठीचार्ज बेकायदेशीर असतो.

पण याचं पुढचं उत्तर आहे. पोलीसांनी लाठीचार्ज करण्यांचे नियम मोडून केलेला लाठीचार्ज बेकायदेशीर असतो.

संयुक्त राष्ट्र संघ अर्थात युनायटेड नेशन्सने Human Rights Standards and Practice for the Police या नावाने एक दस्तऐवज प्रकाशित केलेला आहे. यात How to Use of Force; या नावाचे एक प्रकरण आहे. त्यात पोलीसांनी बळांचा वापर १ का ? २. किती ? ३. कसा ? ४. केव्हा ? करावा व केव्हा करू नये या विषयी सविस्तर माहिती दिलेली आहे.

असामान्य परिस्थितीत (extreme circumstances ) वाजवी व उचित कारणांसाठी (Reasonable reason ) आणि योग्य ती मर्यादा पाळून (within limits) व्यक्ती किंवा जमाव यांच्या विरोधात पोलीस बळांचा वापर करू शकतात.

पोलीसांनी मर्यादा सोडून व क्रूरपणे लाठीचार्ज केला असेल किंवा लाठीचार्ज करण्यामागे कोणतेही वाजवी कारण नसताना लाठीचार्ज केला असेल व त्यांत व्यक्तीला गंभीर मारहाण व दुखापत झाली असेल तर अशा बेजवाबदार पोलीसाच्याचं विरोधात पीडत नागरिक किंवा नातेवाईक किंवा अन्य कोणीही संवेदनशील नागरिक कायदेशीर कारवाईची मागणी व तक्रार करू शकतो.

अशी तक्रार प्रथम पोलीसातील वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे कडे, तसेच तुमच्या विभागातील पोलीस तक्रार प्राधीकरण कार्यालयाकडे तसेच राज्य मानवी हक्क आयोग यांचे कडे करता येते. ही तक्रार कशी करावी यांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक कारा.

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम |  YouTube