योजनेचा लाभ घेण्याची प्रक्रिया
मुद्रांक शुल्क अभय योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर, मालमत्तेच्या हस्तांतरणाबाबत दस्त हा कोणत्याही रक्कमेच्या स्टॅम्प पेपरवर निष्पादित झालेला असणे अनिवार्य आहे.
त्याशिवाय मुद्रांक शुल्क अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला अर्ज करता येणार नाही.
जास्तीत जास्त नागरिकांना या योजनेचा लाभ व्हावा, यासाठी शासनाने नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य यांना संबंधित पक्षकारांना त्यांनी लेखी अर्ज केल्यानंतर १५ दिवसांच्या आत डिमांड नोटीस देण्याबाबतची कार्यवाही करण्याच्या लेखी सुचना केल्या आहेत.
एखाद्या प्रकरणी पूर्वीच डिमांड नोटीस देण्यात आली असेल तर, त्याप्रकरणी नव्याने मुद्रांक शुल्काचे निर्धारण करण्याची गरज नाही.
अशा प्रकरणी सवलत तातडीने लागू करुन तात्काळ डिमांड नोटीस देण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत.
कोणत्याही परिस्थिती जास्तीत जास्त नागरिकांना योजनेचा लाभ देण्यासाठी शासन प्रयत्नशिल आहे.
योजनेचा लाभ
सर्वसामान्य नागरिकांच्या स्थावर मिळकतीच्या हस्तांतरणाचे दस्त ज्यावर कमी मुद्रांक शुल्काची आकारणी केली आहे. त्यांना यथोचित मुद्रांकित करण्याचा लाभ मिळणार आहे.
त्यामुळे, असे दस्त नियमानुसार नोंदविणे शक्य होणार नसले, तरी अशा दस्तांना यथोचित मुद्रांकामुळे कोलॅटरल तथा अप्रत्यक्ष असे पुरावा मुल्य मिळणार आहे.
शहरी तसेच ग्रामीण भागातील जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतीच्या पुर्नविकासास चालना मिळुन सर्वसामान्य नागरिकांना नवीन घरांमध्ये राहण्याची संधी मिळणार आहे.
केवळ, मुद्रांक शुल्काचा कमी भरणा केला असल्याने मानिव अभिहस्तांतरणाची (डिम्ड कन्व्हेयन्स) प्रक्रिया प्रलंबित असलेल्या नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांचे मानिव अभिहस्तांतरण तातडीने पूर्ण होण्यास सहाय्य मिळणार आहे.
याशिवाय, कंपन्यांच्या पुर्नरचना किंवा एकत्रिकरण किवा विभाजनाच्या अनुषंगाने निष्पादित झालेल्या दस्तांवर देखिल मुद्रांक शुल्काची सवलत लागू केल्याने अशा कंपन्यांच्या प्रलंबित राहिलेल्या पुर्नरचना किंवा एकत्रिकरण किंवा विभाजनाच्या प्रक्रियेला चालना मिळुन अशा कंपन्यांच्या माध्यमातून राज्याच्या आर्थिक व सामाजिक विकासाला चालना मिळण्याचा प्रयत्न होणार आहे.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.