Yashwantrao Chavan Mukta Vasahat Yojana घरकुलासाठी मिळणार 1 लाख 20 हजार रुपयांचे अनुदान | असा करा अर्ज |

पात्रता निकष

१) लाभार्थी कुटूंब हे विमुक्त जाती, भटक्या जमाती या मूळ प्रवर्गातील तसेच गावोगावी भटकंती करुन उपजिवीका करणारे असावे.

२) लाभार्थी कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न रु. १ लाख पेक्षा कमी असावे.

३) लाभार्थी कुटूंबाचे स्वत:चे मालकीचे घर नासावे

४) लाभार्थी कुटूंब हे झोपडी/कच्चे घर/ पालामध्ये राहणारे असावे.

५) लाभार्थी कुटूंब हे भूमिहीन असावे

६) लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असावा.

७) लाभार्थी कूटूंबाने महाराष्ट्र राज्यात कोठेही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

८) सदरहू योजनेचा लाभ पात्र कुटूंबातील एकाच व्यक्तीस देण्यात येईल.

९) लाभार्थी वर्षभरात ६ महिने एका ठिकाणी वास्तव्यास असावा.

लाभाचे स्वरूप

  1. ग्रामीण भागामध्ये 20 कुटूंबासाठी एक वसाहत निर्माण करणे. या वसाहतीस पाणीपुरवठा, वीजपुरवठा, सेप्टींक टँकए गटारे व रस्ते अशा सुविधा पुरवणे.
  2. ज्या लाभार्थ्यांकडे स्वत:ची जागा आहे आणि आजपर्यंत त्याने केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही आवास योजनेचा लाभ घेतला नाही, त्यास सदर योजनेचा लाभ देता येईल.
  3. ग्रामीण भागात पुरेशी जागा उपलब्ध होत असल्यास सामुहिकरित्या आणि जागा उपलब्ध होत नसल्यास वैयक्तीकरित्या सदर योजना राबविण्यात यावी.
  4. ग्रामीण भागातील प्रत्येक जिल्हयात सदरहू समाजाच्या लाभार्थ्यांना सामुहिकरित्या अथवा वैयक्तीकरित्या सदरहू योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न करण्यात यावा.
  5. सदर योजनेंतर्गत वैयक्तीक लाभार्थ्यांनाही लाभ देण्यात येतो. डोंगराळ भागातील लाभार्थ्यांकरीता रू.1.30 लक्ष आणि सर्वसाधारण क्षेत्रातील लाभार्थ्यांकरीता रू.1.20 लक्ष इतके अनुदान देण्यात येते.

अर्ज कुठे करावा:

या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीने आपल्या जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त समाजकल्याण विभाग कार्यालयात जाऊन भेट द्यावी. आवश्यक कागदपत्रे व अर्ज भरून आपला अर्ज कार्यालयात जमा करावा.

शासन निर्णय येथे पहा

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top