Agriculture Land शेतजमीन NA करण्याच्या नियमात झाले बदल, काय आहे नवीन नियम ?

Agriculture Land

Agriculture Land शेतकऱ्यांसाठी एन ए हा शब्द काही नवीन नाही. अनेकांना जमीन एन ए करण्याची प्रक्रिया ही वेळखाऊ आणि किचकट वाटते. जमीन एन ए करण्यासाठी वेगवेगळ्या विभागांकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागायचे. त्यामुळे जे सामान्य नागरिक आहेत त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.

एन ए प्रक्रिया सुलभ करण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे आणि महसूल कायद्यामध्ये सुधारणा करून काही महत्त्वाचे बदल केले गेले आहेत. 

या लेखामध्ये आपण बघणार आहोत की, जमीन एन ए म्हणजे काय?जमीन एन ए का करतात? यासाठी अर्ज कुठे करावा? अर्ज कसा करावा? तसेच नवीन बदल काय केले आहेत? याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत लेख शेवटपर्यंत वाचा व आवडल्यास शेअर नक्की करा.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा

हे वाचले का?  Kanda Anudan Update कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture Land एन ए म्हणजे काय?

शेतीसाठी उपयोग करण्यात येणाऱ्या जमिनीचा वापर जर औद्योगिक, निवासी किंवा वाणिज्य कामासाठी उपयोग करायचा असेल तर त्यासाठी कायदेशीर परवानगी आवश्यक असते. शेतजमीनिच्या बिगरशेती जमिनीमध्ये रुपंतरं करण्याच्या प्रक्रियेला जमीन एन ए करणे असे म्हटले जाते.

जमीन एन ए करण्यासाठी एक ठराविक रक्कम कर म्हणून भरावी लागते. महाराष्ट्र मध्ये तुकडेबंदी कायदा लागू असल्यामुळे ठराविक क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र असलेल्या जमिनीच्या तुकड्यांची विक्री करता येत नाही.

जर अशा प्रकारची जमिनीचा तुकडा विकेचा असेल तर आधी त्या तुकड्याचा एन ए लेआऊट विकावा लागतो. या साथी एन ए प्रक्रिया आवश्यक ठरते.

हे वाचले का?  मातोश्री ग्रामसमृध्दी शेतरस्ते योजना, पाणंद रस्ते योजना सुरू

PM Kisan Mandhan Yojana : शेतकऱ्यांना मिळणार 3000 महिना पेन्शन

Agriculture Land जमीन एन ए करण्यासाठी अर्ज कुठे करावा?

जमीन एन ए करायची असेल तर तहसील कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागतो. तहसील कार्यालयातून प्रत्यक्ष अर्ज घेऊ शकता किंवा स्वतंत्र कागदावर स्वत: अर्ज लिहून जमा करू शकता.

अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे:

सातबारा उतारा

सातबाऱ्याशी संबंधित फेरफार नोंद

प्रतिज्ञापत्र

संबंधित जमिनीचा सीमांकन नकाशा

जमिनीचा सर्वे नंबर किंवा गट नंबर नकाशा

मिळकत पत्रिका

Agriculture Land एन ए प्रक्रियेत कोणते महत्वाचे बदल झाले आहेत?

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 42 नुसार जमीन बिगरशेती करण्यासाठी परवानगी दिली जाते. कलम 42(ब), (क)आणि (ड ) अंतर्गत यामध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. या सुधारणा केल्यामुळे जमीन एन ए प्रक्रिया सुलभ झाली आहे.

हे वाचले का?  पुरग्रस्त नुकसान भरपाई जाहीर, Purgrast nuksan bharpai 2021

महसूल आणि वन विभागाने 13 एप्रिल 2022 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार , ज्या क्षेत्राचा अंतिम विकास आराखडा जाहीर झाला आहे, अशा क्षेत्रातील जमीनिसाठी एन ए परवानगीची गरज भासणार नाही. यामुळे प्रक्रिया जलद होईल व वेळ आणि मेहनत वाचेल.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top