Non Agricultural Land Certificate आता जमिन NA करण्याची गरज नाही

Non Agricultural Land Certificate

Non Agricultural Land Certificate महसूल विभागाकडून बांधकाम व्यावसायिकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या भूखंडांवर बांधकाम परवानगी मिळाली आहे, अशा भूखंडांसाठी अकृषक म्हणजेच एन ए परवानगीची आवश्यकता असणार नाही. करवसुली ही बांधकाम परवानगी व्यवस्थापन प्रणाली द्वारे होणार आहे.

GR डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

बांधकामासाठी वापरण्यात येणारे भूखंड हे अकृषक म्हणजेच बिगर शेती करण्याचे मागील अनेक वर्षात अर्थपूर्ण व्यवहार झाले व त्यात अनेकांचा फायदाही झाला आहे. परंतु पुढील काळात स्वतंत्रपणे भूखंड व अकृषक करण्याची आवश्यकता नसेल. अशा प्रकारचा निर्णय राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने घेतला आहे. त्यामुळे बांधकाम व्यवसायिकांना दिलासा मिळाला आहे.

GR डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Non Agricultural Land Certificate वेळेची होणार बचत:

जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केल्यानंतर संबंधित असलेले तहसीलदार त्याची सनद तयार करत असे. त्यानंतर नगर नियोजन विभागाचे सहाय्यक संचालक याची शहानिशा करत असे. अर्ज केलेल्या व्यक्तीची जमीन ही निवासी, व्यावसायिक किंवा औद्योगिक स्वरुपाच्या बांधकामासाठी योग्य आहे की नाही, हे तपासून पाहिले जात असे व त्यानंतर जमीन एन एस ची परवानगी देण्यात येत होती.

हे वाचले का?  Tukade Bandi Kayda तुकडेबंदी कायदा मधील महत्त्वाच्या तरतुदी

GR डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

या प्रक्रियेसाठी कमीत कमी सहा महिन्यांचा कालावधी लागत असे. नकाशे मंजुरीसाठी कमीत कमी सहा महिने, त्यानंतर पर्यावरण मंजुरीसाठी तीन महिने व खोदकाम करण्यासाठीच्या परवानगीसाठी तीन महिने, अशा पद्धतीने सर्वसाधारणपणे जमीन एन एस करण्याच्या प्रक्रियेसाठी दीड वर्षाचा कालावधी लागत असे. परंतु शासनाच्या या निर्णयामुळे जमीन एन ए करण्याची परवानगी लवकर मिळणे शक्य होईल.

शासनाच्या या निर्णयामुळे बांधकाम क्षेत्राला गती मिळू शकेल.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

हे वाचले का?  Mediclaim मध्ये PPE Kit & Biomedical waste परतावा देणे बंधनकारक

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top