Amdar Salary आमदार यांचे वेतन, भत्ते आणि सोयी सुविधा

११. विमानाने मोफत प्रवास: एका आर्थिक वर्षात

अ) राज्यांतर्गत:- एकूण 32 वेळा एकेरी (राज्यातील कोणत्याही विमानतळापासून राज्यातील कोणत्याही विमानतळापर्यंत)

(ब) राज्याबाहेर:- एकूण 8 वेळा एकेरी (राज्यातील कोणत्याही विमानतळापासून भारताच्या हद्दीतील कोणत्याही विमानतळापर्यंत)

१२:संगणक सुविधा:

प्रत्येक सदस्याला स्थानिक विकास निधीमधून एक लॅपटॉप/डेस्कटॉप संगणक, एक लेझर प्रिंटर पुरविण्यात येतो. (सदरहू सुविधा नियोजन ,विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडून पुरविण्यात येते.)

१३. वाहन कर्जावरील व्याजाची प्रतिपूर्ती :

प्रत्येक सदस्याला प्रत्येक टर्ममध्ये नवीन मोटार गाडी खरेदी करण्याची सुविधा पुरविण्यात आलेली आहे. त्यास बँक किंवा इतर वित्तीय संस्थांकडून रु.10,00,000/- इतक्या कमाल मर्यादेपर्यंत कर्ज घेण्याचा हक्क आहे. कर्जाच्या रकमेवरील 10% व्याज दराची रक्कम किंवा कर्ज त्यापेक्षा कमी दराने उपलब्ध झाले असल्यास, प्रत्यक्षात आकारण्यात आलेल्या व्याजदराच्या रक्कमेची प्रतिपूर्ती, योग्य ती पावती किंवा कागदपत्रे सादर करण्यात आल्यानंतर कर्ज घेतलेल्या दिनांकापासून कमाल वर्षांच्या कालावधीपुरती किंवा यापैकी जो कालावधी कमी असे, तेवढ्या मुदती पुरती शासनाकडून करून देण्यात येईल.

१४. स्थानिक विकास निधी:

प्रत्येक आमदार सदस्याला प्रत्येक वर्षी रु. 2,00,00,000/- (रुपये दोन कोटी) (नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन) यांच्याकडून देण्यात येते.

१५. वैद्यकीय सुविधा:

विद्यमान व माजी विधानमंडळ सदस्य व त्यांच्या कुटुंबियांना वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती करणे : “महाराष्ट्र विधानमंडळाच्या सर्व विद्यमान व माजी सदस्यांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना दिनांक 1 फेब्रुवारी, 2018 रोजीपासून आरोग्य विमा योजना (CASHLESS MEDICAL THROUGH THE INSURANCE SCHEME) लागू करण्यात आली आहे.”

१६. निवृत्ती वेतन:

(अ) राज्य विधानमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य म्हणून ज्यांनी “सदस्य” म्हणून शपथ घेतली आहे अथवा घेतल्यास, अशा व्यक्तीस दरमहा रुपये पन्नास हजार निवृत्तीवेतन देण्यात येईल.

(ब) ज्या वेळी एखाद्या व्यक्तीने पाच वर्षापेक्षा जास्त मुदतीसाठी सदस्य म्हणून सेवा केली असेल, त्यास त्याच्या पाच वर्षावरील प्रत्येक वर्षासाठी दरमहा दोन हजार रूपये या प्रमाणात जादा निवृत्तीवेतन देण्यात येईल.

१७. कुटुंब वेतन:

(अ) मृत्यू पावलेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या माजी सदस्याच्या विधवेस किंवा विधुरास दरमहा रूपये चाळीस हजार कुटुंब वेतन देण्यात येईल.

(ब) मृत सदस्याच्या विधवेच्या किंवा विधुराच्या मृत्यूच्या पश्चात् त्या सदस्याचे अज्ञान अपत्य किंवा अपत्ये हयात असतील तर, अशा अज्ञान अपत्याला किंवा अपत्यांना, विधवा किंवा विधुर यांना ज्याप्रमाणे निवृत्तिवेतन देय होते त्याचप्रमाणे दरमहा निवृत्तिवेतन लागू असेल.

१८. रेल्वे प्रवास सुविधा (माजी सदस्य):

(१) महाराष्ट्रातील माजी विधानमंडळ सदस्यांना रेल्वेच्या प्रथम वर्गाने किंवा वातानुकूलित व्दितीय शयनयानाने विनामूल्य प्रवास सवलत राज्यात व राज्याबाहेर अशी एकत्रितपणे दरवर्षी 35,000 कि.मी. इतक्या मर्यादेपर्यंत अनुज्ञेय आहे.

(२) माजी विधानमंडळ सदस्यांना एका सोबत्यासह प्रथम वर्गाने अथवा वातानुकूलित व्दितीय शयनयानाने प्रवास अनुज्ञेय असून त्यांनी केलेल्या प्रवासाच्या खर्चाची प्रतिपूर्ती खाली नमूद केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता करण्याच्या अधीन राहून करण्यात येते:

(अ) माजी सदस्यांनी स्वत: अथवा एका सोबत्यासह अनुज्ञेय वर्गाच्या प्रवासाची तिकिटे उपलब्ध नसल्यामुळे, निम्न श्रेणीच्या वर्गाने प्रवास केल्यास, ज्या वर्गाने त्यांनी प्रत्यक्ष प्रवास केला असेल, त्या वर्गाच्या भाड्याची प्रतिपूर्ती त्यांना अनुज्ञेय आहे.

(ब) माजी सदस्या सोबत त्याच्या सोबत्याने केलेल्या प्रवासाची परिगणना सदस्यांना अनुज्ञेय असलेल्या किलोमीटर्सच्या मर्यादेमध्ये करण्यात येत नाही.

क) प्रस्तुत प्रवास सवलतीच्या प्रतिपूर्तीची मागणी माजी सदस्यांनी प्रवास केल्याच्या तारखेपासून तीन महिन्याच्या आत ते ज्या ठिकाणी निवृत्तीवेतन घेत असतील, त्या जिल्ह्याचे कोषागार अधिकारी अथवा त्या तालुक्याचे उप कोषागार अधिकारी यांच्याकडे देयके सादर करतील.

(३) माजी विधानमंडळ सदस्यांनी 35,000 कि. मी. च्या मर्यादेमध्ये राज्यात व राज्याबाहेर रेल्वेऐवजी विमानाने प्रवास केल्यास, त्यांना अनुज्ञेय असलेल्या रेल्वे भाड्याच्या रकमेची प्रतिपूर्ती जिल्हा कोषागार अथवा उप कोषागार अधिकारी यांच्याकडून करण्यात येईल. प्रस्तुत प्रवासाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीची मागणी करताना त्यांनी विमान प्रवासाचे मूळ तिकीट सादर करावे.

(४) माजी सदस्यांना मुंबईतील उपनगरीय रेल्वे गाडीच्या प्रथम वर्गातून प्रवास करण्याकरिता मासिक अथवा त्रैमासिक सिझन तिकिटाची प्रवास सवलत विहित केलेल्या प्रतिवर्षी किलोमीटर च्या मर्यादेच्या अधीन राहून देण्यात येते. त्यांनी सिझन तिकिटाची सवलत घेऊन प्रवास केल्यानंतर, किलोमीटर परिगणना करताना संबंधित सदस्यांनी प्रवास केलेल्या अंतरासाठी प्रथम वर्गाच्या तिकिटासाठी आणि सिझन तिकिटासाठी रेल्वेने ज्या पटीमध्ये प्रवासाचा दर विहित केला आहे, त्याच पटीने किलोमीटरची परिगणना करण्यात येऊन तेवढे किलोमीटर अनुज्ञेय किलोमीटर मधून वजा करण्यात येतात.

(१९) मार्ग परिवहन सेवेने मोफत प्रवास (माजी सदस्य ):

महाराष्ट्र विधानमंडळाच्या माजी सदस्यांना त्यांचे विवाहसाथी किंवा एक सोबती यांच्यासह महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून अमर्याद विनामूल्य प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी खालील क्लिक करा.

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top