Police Patil म्हणजे गावातील चालते बोलते गृह खाते.

पोलिस पाटील
police patil
Police Patil

शिवरायांच्या काळात गाव पातळीवरील मुख्य व्यक्ती म्हणुन “पाटील” हे पद अस्तित्वात होते, प्राचीन काळापासूनच गावाचा कारभार सांभाळण्यासाठी गाव प्रमुखाची महत्त्वाची भूमिका असायची त्या भुमिकेतील व्यक्ती कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच सामाजिक समस्या सोडण्यातही सहभागी असायची.

महाराष्ट्रात शिवरायांच्या काळात गाव पातळीवरील मुख्य व्यक्ती म्हणून “पाटील “हे पद अस्तित्वात होते या पदावर सहसा कर्तृत्ववान, शुर व धाडसी व्यक्तीच असायची, गाव गाडा चालवत असताना न्यायपुर्ण वर्तणुकीमुळे अनेक पाटील हे इतिहासात अजरामर झाले.

इंग्रजांच्या काळात गाव पातळीवरील कायदा सुव्यवस्था व महसुल यावर देखरेख करण्याचे कार्य तत्कालीन समर्थ व्यक्तीकडे आले ब्रिटीशांनी या घटकाना कायदेशीर मान्यता देण्यासाठी 1967 साली ग्राम पोलीस अधिनियम अमलात आणला व Police Patil या शासनाच्या गावपातळीवरील शेवटच्या घटकाच्या पदाची निर्मिती झाली.

त्यानंतर एका पिढीकडुन दुसर्या पिढीकडे हे पद वारसा परंपरेने चालत राहीले, त्यावेळी पाटलाना शेतसारा वसुल करणे, सामान्य तक्रारींचा न्यायनिवाडा करणे त्यासाठी गावपातळीवर पंच कमिटी नेमणे हे कार्य पाटील करत असे.

साधारण त्या काळातील पाटील हा एकटाच सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक, व पोलीस यांचे कार्य गाव पातळीवर करत असे. तसे त्यांना अधिकार ही होते, या कामात त्यांना कोतवाल किंवा नेमलेले बिगारी सहाय्य करत असत.

हे वाचले का?  Title Clear Property 'टायटल क्लिअर' जमीन म्हणजे नेमकं काय?

15ऑगष्ट1947ला देश स्वतंत्र झाल्यावर ब्रिटीशांनी केलेले बरेच कायदे रद्द करणेत आले त्यात ग्राम पोलीस अधिनियम हा ही होता, त्यानंतर महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था अंमलात आली.

ऐतिहासिक असलेले Police Patil या पदाचे विकेंद्रीकरण होऊन ग्रामपंचायत ,सरपंच, सदस्य ही व्यवस्था अस्तित्वात आली व Police Patil हे पद आपोआपच कालबाह्य ठरत गेले.

त्यात बरेच Police Patil राजकारणात गेले व यशस्वीही झाले व बर्याच पोलीस पाटलांनी या पदाला पुन्हा मान्यता मिळावी म्हणुन शासन दरबारी सातत्यपुर्ण पाठपुरावा केला म्हणुन 1967 ला पुन्हा ग्रामपोलीस अधिनियम हा कायदा संमत करण्यात आला व त्यानुसार स्वतंत्र महसुली गावांना Police Patil नेमण्यात आले, त्यांचा उपयोग गाव पातळीवर महसुल व पोलीस प्रशासनाला नियमीत होत गेला.

हे ही वाचा

हे वाचले का?  Domestic Violence act कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा २००५

महाराष्ट्र ग्रामपोलीस अधिनियम 1967चा अधिनियम क्रमांक 86 अन्वये Police Patil गावपातळीवर कार्यकारी दंडाधिकारी यांच्या आदेशान्वये कार्य करत असतात.

त्यामध्ये कार्यकारी दंडाधिकारी गाव पातळीवरील जी माहीती व पत्रके मागवतील ती पुरविणे, गावातील अपराधांचे प्रमाण व समाज स्वास्थ्य याबाबत माहिती पुरविणे.

पोलीस अधिकारी यांना आवश्यक ती माहीती देणे, सार्वजनिक शांततेत बाधा पोहचणार नाही यासाठी आवश्यक माहीती अधिकारी यांना पुरविणे, गावच्या हद्दीत गुन्हा घडु नये.

लोकांना उपद्रव होऊ नये म्हणुन बंदोबस्त करणे व आपल्या हद्दीतील गुन्हेगारांचा शोध घेऊन न्यायालयासमोर हजर करणेस मदत करणे इत्यादी कामे Police Patil करतात.

कायद्यात तरतुद असलेल्या या कामांबरोबरच गावातील सण,उत्सव,यात्रा, राजकारण, निवडणुका या सर्वच घडामोडीवर Police Patil लक्ष ठेउन असतात. Police Patil या नेमणुकीवरील व्यक्ती ही त्याच गावची असल्याने सर्वाना ओळखत असते.

गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक ,बेकायदेशिर व्यवसाय करणारे, अवैध्य धंदेवाले, याबद्धल पुर्ण माहीती ही पोलीस पाटलाना असते,व ती तात्काळ पोलीस प्रशासनाला दिल्याने अवैध धंद्यावर कारवाई करणे सोपे जाते. ग्रामपंचायत व वेगवेगळ्या निवडणुकांच्या काळात Police Patil गावपातळीवरील हालचालींबाबत पोलीसप्रशासनाला माहीती उपलब्ध करुन देत असतो.

हे वाचले का?  Ration Card Online Maharashtra रेशन कार्ड मोठी अपडेट | नवीन कार्ड काढणे, जुने रेशन कार्ड दुरुस्ती ची सर्व कामे घरबसल्या होणार |

त्यामुळे भविष्यातील निर्माण होणार्या संघर्षाला वा गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यास उपयोग होतो. बरेचदा परप्रांतातुन गुन्हा करुन गुन्हेगार अगदी गावापर्यंत फरार होऊन लपण्यासाठी येतात व बिनबोभाट राहत असतात.

Police Patil गावातच रहात असल्याने अशा स्वरुपाचे भाडेकरू म्हणुन राहत असलेल्या व्यक्तींचा तपास लावून बरेच गुन्ह्यांचा शोध लावण्यास प्रशासनास मदत करतो.

पुर ,भुकंप, गारपिट व अतिवृष्टी यासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या कालावधीत माहीतगार म्हणुन पोलीस पाटलांचा उपयोग होतोच त्याचबरोबर जातीय धार्मिक तेढ,गाव पातळीवर भ्रष्ट कारभार , गुंडगिरी यासारख्या प्रकाराना आळा घालणेसाठी Police Patil उपयोगी ठरलेले आहेत व राहतील.

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube 

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहन्यायासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top