ग्रामपंचायत कार्यालय कसे चालते? चला समजून घेऊया..!

ग्रामपंचायतचा कारभार सुरळीत व सुगम चालावा म्हणून ग्रामपंचायतीच्या दप्तरांची नमुना नंबर 1 ते 27 अशी विभागणी केलेली असते. हे साधारणता पुढीलप्रमाणे असतात. जागरूक नागरिकांनी व माहिती अधिकार कार्यकर्त्याने माहिती अधिकारात निरीक्षणासाठी अर्ज करून विविध नमुन्यातील दप्तरांचे निरीक्षण करून सरपंच ग्रामसेवक व्यवस्थित कारभार करतात की नाही याची पडताळणी करू शकतात हे नमुने केवळ पथदर्शक आहेत या ग्रामपंचायतीवर थोडाफार बदल असू शकतो.

नमुना १ अंदाजपत्रक

नमुना 2 पुरवणी अंदाजपत्र

नमुना 3 जमा

नमुना 4 खर्च

नमुना 5 रोकड वही कॅश बुक याला ग्रामपंचायत चा आत्मा ही म्हणतात.

नमुना ६ वर्गीकरण रजिस्टर

नमुना ७ सामान्य पावती

नमुना 8 कर आकारणी रजिस्टर(assessment रजिस्टर)

नमुना 10 कर पावती

नमुना 11 किरकोळ जमा रकमांची रजिस्टरनमुना बारा तेरा चौदा हे रद्द झाले आहेत

नमुना 15 प्रमाणक वाउचर किंवा बिलबुक

नमुना 16 कर्मचारी वेतन मानाचे रजिस्टर सर्विस बुक

नमुना 17 पोस्टाचे तिकीट रजिस्टर

नमुना 18 stock book

नमुना 19 मृतसाठा रजिस्टर (deadstock book)

नमुना 20 अनामत रक्कम परत रजिस्टर

नमुना 21 किरकोळ जमा रकमांचे रजिस्टर

नमुना 22 मजुरांची हजेरी.

नमुना 23 मूल्यांकन पुस्तिका (मेजरमेंट book)

नमुना 24 कर्मचारी वेतन रजिस्टर.

नमुना 25 स्थावर मालमत्ता.

नमुना 26 रस्त्यांची माहिती.

नमुना 27 जमिनीची माहिती.

जन्म नोंदणी रजिस्टर:- या नोंदवहीत गावातील जन्मलेल्या प्रत्येक बाळाची नोंद घेतली जाते.

विवाह नोंदणीचे रजिस्टर:- विवाह नोंदणीचे अधिकार आता प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत त्यामुळे गावपातळीवर ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी हे विवाह निबंधक म्हणून काम पाहतात ग्रामस्थांच्या अवेदना नुसार वाहन उभे करून दिली जाते.

मृत्यू नोंदणी रजिस्टर:- या नोंदवहीत गावात मृत्यू पावलेले व्यक्तींची नोंद केली जाते.

उपजत मृत्यू नोंद रजिस्टर:- या नोंदवहीत गावात जन्मतःच मृत्यू पावलेल्या बालकांच्या नोंदी घेतल्या जातात.

पशु नोंदवही:- यामध्ये गावातील पशु सखी ची गणना करून नोंदी घेतल्या जातात व गाय बैल म्हैस आधी पशुपालकांना मागणीनुसार पशु नोंदीचे दाखले करून दिले जातात.
ग्रामपंचायतीच्या प्रत्येक महिन्यास मासिक मिटीग होणे आवश्यक आहे सरपंच व निवडून गेलेल्या प्रत्येक पंचांनी या मीटिंगसाठी हजर राहणे आवश्यक आहे मासिक मिटींगचे ठराव लेखी माहिती अधिकारात प्रत्येक नागरीकरणात मागता व पाहता येतात.

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top