अर्ज कुठे करावा?
- कृषी सेवा केंद्राचा परवाना मिळवण्यासाठी अर्जदार हा कृषी पदविका धारक किंवा कृषी विषयांमध्ये पदवीधर असावा लागतो.
- कृषी सेवा केंद्राचा परवाना काढण्यासाठी अर्जदार ऑनलाइन अर्ज करावा लागतो.
- अर्ज करण्यासाठी आपले सरकार या पोर्टल वर जावे. पोर्टलवर जाऊन सर्वप्रथम तुम्हाला नोंदणी करावी लागेल. त्यानंतर कृषी विभाग पर्याय निवडावा. नंतर कृषी सेवा परवाना या पर्यायावर क्लिक करावे.
- यामध्ये रासायनिक खते, बियाणे, किटकनाशके यासाठीचा परवाना काढता येतो.
- तीनपैकी तुम्हाला कोणत्याही एकासाठी किंवा तिन्ही गोष्टींसाठी परवाना मिळू शकतो.
तुम्ही ऑनलाइन भरलेला अर्ज हा जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी यांच्याकडे जातो. जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी यांनी मंजूरी दिल्यानंतर अर्ज कृषी उपसंचालक यांच्याकडे जातो. कृषी उपसंचालकांकडून मंजूरी मिळाल्यानंतर जिल्हा कृषी अधिकार्यांकडे मंजूरी साठी पाठवला जातो.
जिल्हा कृषी अधिकार्यांची मंजूरी मिळाली की कृषी सेवा केंद्र सुरू केले जाऊ शकते.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.