सिंचन विहिरीसाठी लाभधारकाची निवड कशी करायची, लाभधारकाची पात्रता काय असावी , तसेच अर्जा सोबत कोणती कागदपत्रे जोडावी याची माहिती पुढील प्रमाणे आहे.
सिंचन विहीर अनुदान योजना- लाभधारकाची निवड:
- अनुसूचित जाती
- अनुसूचित जमाती
- भटक्या जमाती
- निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती )
- दारिद्रय रेषेखालील लाभार्थी
- स्त्री कर्ता असलेली कुटुंबे
- शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्ति कर्ता असलेली कुटुंबे
- जमीन सुधारणांचे लाभार्थी
- इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी
- अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वन निवासी अधिनियम २००६ खालील लाभार्थी
- सीमान्त शेतकरी (२.५ एकर पर्यन्त भूधारणा)
- अल्प भूधारक(५ एकर पर्यन्त भूधारणा
डाऊनलोड GR Sinchan Vihir Anudan Yojana
सिंचन विहीर अनुदान योजना- लाभधारकाची पात्रता
- लाभ धारकाकडे किमान ०.४० हेक्टर क्षेत्र सलग असावे.
- पेयजल स्त्रोताच्या ५०० मीटर परिसरात विहीर खोदकाम कर्ता येणार नाही.
- दोन सिंचन विहीरीनमधील १५० मीटर अंतराची अट पुढील बाबींना लागू राहणार नाही:
- दोन सिंचन विहीरीमधील १५० मीटर अंतराची अट ही run off zone, तसेच अनुसूचित जाती व जमाती व दारिद्रय रेषेखालील कुटुंब याकरिता लागू करण्यात येऊ नये.
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहीर मंजूर करताना खाजगी विहीरीपासून १५० मीटर अंतराची अट लागू राहणार नाही.
- लाभ धारकाच्या ७/१२ वर याआधीच विहीरीची नोंद असू नये.
- लाभ धारकाकडे एकूण क्षेत्राचा दाखल असावा.
- एकापेक्षा अधिक लाभ धार संयुक्त विहीर घेऊ शकतील मात्र त्यांचे एकूण सलग जमिनीचे क्षेत्र ०.४० हेक्टर पेक्षा जास्त असावे.
- ज्या लाभार्थ्याना विहीरीचा लाभ देण्यात येणार आहे तो जॉब कार्ड धारक असला पाहिजे.
अर्जा सोबत जोडावयाची कागदपत्रे:
- ७/१२ च्या ऑनलाईन उतारा
- ८अ चा ऑनलाईन उतारा
- जॉबकार्डची प्रत
- सामुदायिक विहीर असल्यास सर्व लाभार्थी मिळून ०.४० हेक्टर पेक्षा अधिक जमीन असल्याचा पंचनामा
- सामुदायिक विहीर असल्यास सामोपचाराने पाणी वापराबाबत करारनामा
डाऊनलोड GR Sinchan Vihir Anudan Yojana