Birsa Munda Krushi Kranti Yojana बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना संपूर्ण माहिती |

अर्ज कुठे करावा?

अर्जदाराने या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने www.agriwell.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर करावा.  नविन विहीरीसाठी पुर्वसंमती व कार्यारंभ आदेश असणे आवश्यक आहे.

नवीन विहीरीसाठी लाभार्थ्याची निवड झाल्यानंतर पंचायत समितीचे कृषी अधिकारी हे कार्यारंभ आदेश देतील. त्यानंतर 30 दिवसाच्या आत काम सुरु करावे.

  • शेततळे अस्तरीकरणासाठी 500 मायक्रॉन जाडीची प्लास्टिक फिल्म रिइनफोर्सड एचडीपीई जिओ मेंबरेन फिल्म वापरावी.
  • ठिबक सिंचनासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेतून 55 टक्के अनुदान व या योजनेतून 35 टक्के म्हणजे 50 हजार रुपये मर्यादेत अनुदान असे 90 टक्के अनुदान लाभार्थ्याला देण्यात येईल.
  • तुषार सिंचनसाठी प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेतून 55 टक्के अनुदान व या योजनेतून कमाल 25 हजार रुपये अनुदान लाभार्थ्यांना देण्यात येईल.  
  • पंप संचाकरीता पुर्व संमती मिळाल्यानंतर लाभार्थ्यांने एक महिन्याच्या आत पंप संच बाजारातील अधिकृत विक्रेत्यांकडून खरेदी करावा.
  • पाईप खरेदीसाठी पुर्व संमती मिळाल्यानंतर एक महिन्याचा आत लाभार्थ्यांनी त्यांच्या पसंतीनुसार आयएसआय मार्क पाईप खरेदी करावे.
  • किमतीच्या 100 टक्के, कमाल 30 हजार रुपये अनुदान देण्यात येईल.
  • पीव्हीसी पाईपच्या बाबतीत उच्चतम अनुदान 70 रुपये प्रती मिटर आहे.
  • एचडीपीई लॅमिनेटेड पाइपच्या बाबतीत उच्चतम अनुदान 40 रुपये प्रती मिटर आहे.

परसबागेत आदिवासी शेतकऱ्यांना त्यांच्या कुटूंबासाठी लागणारा भाजीपाला त्यांच्या घराभोवतीच पिकविणे शक्य आहे.

यासाठी शेतकऱ्याने वेगवेगळया प्रकारच्या भाजीपाल्याचे बियाणे उदा. भेंडी, गवार, चवळी, दुधी भोपळा, डांगर भोपळा, शेवगा, काकडी, दोडका इत्यादी. महाबीज किंवा एनएससी इत्यादी बियाणे उत्पादक कंपनीच्या अधिकृत परवानाधारक विक्रेत्याकडून खरेदी करुन पावती सादर करावी.

यासाठी देण्यात येणारे अनुदान इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफरव्दारे (इएफटीव्दारे) लाभार्थ्याच्या आधार क्रमांक संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येते.

या योजनेचा आदिवासी शेतकरी बांधवांना लाभ घेण्यासाठी त्यांनी संबंधित पंचायत समितीचे कृषी अधिकारी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किंवा जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top