Grape Farm Protection अवकाळी पाऊस, गारपीटी पासून द्राक्ष बागांची होणार संरक्षण | प्लास्टिक कव्हरला मिळणार 50 टक्के अनुदान |

असे मिळेल अनुदान Grape Farm Protection:

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत द्राक्ष बागांच्या संरक्षणासाठी मिळणाऱ्या प्लास्टिक कव्हरच्या अनुदानासाठी प्रति एकर चार लाख 81 हजार 364 रुपये इतका खर्च निश्चित करण्यात आला आहे. प्रति लाभार्थी वीस गुंठे ते एक एकर यादरम्यान लाभ देण्यात येणार आहे. परंतु अनुदान हे खर्चाच्या 50% किंवा प्रति एकर दोन लाख 40 हजार 672 रुपये इतके देण्यात येईल.

असा करा अर्ज

राज्यामधील नाशिक, सांगली, सोलापूर, पुणे, धाराशिव, जालना, अहमदनगर आणि सातारा जिल्ह्यातील शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
या योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवर जाऊन फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करता येतो.

प्रकल्पांतर्गत महाडीबीटी प्रणालीवर लाभार्थ्याचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर लाभार्थ्याची निवड लॉटरी (Lottery) पध्दतीने करण्यात येईल.

निवडलेल्या लाभार्थ्यांना सक्षम प्राधिकारी यांनी पूर्व संमती दिल्यानंतर तसेच काम पूर्ण होवून मोका तपासणी झाल्यानंतर अनुदान आधार लिंक लाभार्थ्याच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येईल.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top