Bogas Satbara बोगस सातबारा ओळखण्याचे 3 उपाय !!!

2. क्यू आर कोड.

सरकारने नवीन बदलानुसारचा सातबारा उतारा उपलब्ध करून दिला आहे त्यात क्यू आर कोड हा असतोच. हा क्यू आर कोड जर तुम्ही स्कॅन केला तर ओरिजिनल सातबारा उतारा तिथे दिसतो. म्हणजेच त्या जमिनीचा खरा मालक कोण हे आपल्याला तिथे दिसतं.
पण जर का तुमच्याकडे जर कोणी डिजिटल स्वाक्षरीचा सातबाराची प्रिंट आउट जर तुमच्याकडे कोणी घेऊन आलं आणि त्याच्यावर क्यू आर कोड नसेल तर तो सातबारा उतारा हा बोगस असल्याचा तुम्ही समजून घेऊ शकता.

3. LGD कोड आणि ई-महाभूमी प्रकल्पाचा लोगो.

बोगस सातबारा ओळखण्याचा तिसरा आणि सर्वात सोपा उपाय म्हणजे LGD कोड आणि ई-महाभूमी प्रकल्पाचा लोगो.
नवीन बदलानुसार सरकारने प्रत्येक सातबारा उताऱ्यावर LGD कोड म्हणजेच Local Government directory code नमूद करण्यास सुरुवात केलेली आहे.
LGD कोड हा तुमच्या गावासाठी दिलेला विशिष्ट ओळख क्रमांक असतो. सातबारा उतारा वर गावाच्या नावासमोर तो नंबर नमूद केलेला असतो.
तुमच्या जमिनीचा व्यवहार करताना तुमच्यासमोर सादर केलेला सातबारा उताऱ्यावर LGD कोड नसेल तर तो सातबारा उतारा बोगस असतो.

याशिवाय महाराष्ट्र सरकारच्या नवीन बदलानुसार सातबारा उताऱ्यावर महाराष्ट्र शासनाचा आणि ई महाभूमी प्रकल्पाचा लोगो असण गरजेच आहे.

महाराष्ट्र शासनाचा लोगो हा सातबारा उताऱ्यावर सर्वात वरच्या बाजूला असतो आणि इ-महाभुमी प्रकल्पाचा लोगो हा सर्वात मध्यभागी असतो. त्यामुळे तुमच्याकडे जर कोणी डिजिटल सातबाराची प्रिंटआउट घेऊन आलं आणि त्याच्यावर हे दोन्ही लोगो नसतील तर तो सातबारा उतारा हा बोगस आहे हे तुम्ही समजून घेऊ शकता.

तर मग मंडळी, जमिनीची खरेदी विक्री करताना बोगस सातबारा उतारा ओळखण्याचे आणि आपली फसवणूक टाळण्याचे उपाय हे तुम्हाला कसे वाटले हे तुम्ही आम्हाला कमेंट्स द्वारे नक्की कळवा. व आमच्या पेजला फॉलो करा.

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top