आता ही कायदेशीर गरज म्हणजे नक्की काय? याबाबत देखील संपूर्ण माहिती घेऊयात.
सुप्रीम कोर्टाने जी लिगल नेसेसिटी वेगवेगळ्या न्याय निर्णयामध्ये सांगितली आहे ते आपण पाहूयात की ज्या कारणासाठी प्रॉपर्टी विक्री केली तर त्यास आव्हानित करता येणार नाही.
पालनपोषण :
यामध्ये सर्वप्रथम पालन पोषण येतं.पालनपोष मित्रांनो जर समजा कुटुंबात असणारी शेती काही कारणामुळे पिकली नाही तर अशा वेळेस कुटुंबातील सदस्यांचे उपासमार होणे शक्य आहे तर अशा वेळी त्या सदस्यांच्या उदरनिर्वाहासाठी प्रॉपर्टी विक्री केली तर ते आव्हानीत करता येणार नाही.
विकसन कामासाठी :
प्रॉपर्टी मध्ये काही विकसन करावयाचे असेल तर ,म्हणजेच जर शेतामध्ये विहीर खोदणे किंवा शेतीत माती भरणे इत्यादी कारणांसाठी प्रॉपर्टी विक्री केली तर त्यास आव्हानित करता येणार नाही.
लग्नासाठी किंवा उपचारासाठी :
समजा कुटुंबातील एखाद्या सदस्याचे लग्न करावयाचे असेल, किंवा एखाद्या रोगाचा मोठा उपचार करावयाचा असेल, म्हणजेच एखादी शस्त्रक्रिया वगैरे करावयाची असेल, तरीदेखील खरेदीखत आव्हानित करता येणार नाही.
केस सुरु असेल तर :
प्रॉपर्टी च्या संबंधाने कोर्टात एखादी केस सुरू असेल आणि त्या केसच्या खर्चासाठी काही प्रॉपर्टीची विक्री केली तर त्याच देखील आव्हानित करता येणार नाही.
वडिलोपार्जित कर्ज :
वडिलोपार्जित कर्ज फेडण्यासाठी जर प्रॉपर्टीची विक्री केली तरी आपणास त्या विक्रेता वाणीत करता येणार नाही परंतु वडिलोपार्जित कर्ज म्हणजे जी व्यक्ती प्रॉपर्टीची विक्री करतोय त्याच्या वडिलोपार्जित कर्ज असावे.
सरकारी देणे देण्यासाठी :
जर समजा खूप वर्षापासून तुम्ही महसूल दिलेला नसेल किंवा अन्य कर सरकारला भरलेला नसेल आणि त्यासाठी जमिनीची विक्री केली तर त्यास आव्हानित करता येणार नाही.
सुप्रीम कोर्टाच्या इतर जजमेंट मधील आपण अर्थ काढला तर या कायदेशीर गरजेसाठी जर वडिलोपार्जित प्रॉपर्टी विक्री केली तर आपण ती विक्री आव्हानित करू शकत नाही.
परंतु जर कायदेशीर गरज सोडून स्वतःच्या फायद्यासाठी विक्री केलेली असेल तर तुम्ही त्यास आव्हानित करू शकता.
आजच्या लेखामध्ये आपण इथेच थांबणार आहोत. अधिक माहितीसाठी आमच्या पेजला फॉलो करा.
हे वाचले का?
- SAI Recruitment 2023 भारतीय क्रीडा प्राधिकरण विविध पद भरती
- Mahapalika Recruitment खुशखबर! खुशखबर! खुशखबर! राज्यातील विविध महापालिका मध्ये होणार 22,381 पदांसाठी मेगा भरती!!!
- Bogus Satbara बोगस सातबारा ओळखण्याचे 3 उपाय !!!
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.