Proof of Property Ownership हे कागदपत्रे सिद्ध करतात जमिनीवरील स्वतःचा मालकी हक्क. बघूया कोणते आहेत हे पुरावे..?

2. खरेदी खत 

जमिन खरेदी विक्री करण्याच्या व्यवहारात खरेदी खत हा जमिनीचा मूळ मालकी सिद्ध करण्यासाठी वापरला जातो. जमिनीचा मालकी हक्क सिद्ध करणारा प्रथम पुरवा म्हणजे खरेदीखत होय या खरेदी खतावर जमिनीचा व्यवहार कधी झाला आहे कोणत्या दोन व्यक्तींमध्ये झाला आहे तसेच किती क्षेत्रावर झाला आहे या गोष्टीची नोंद असते त्याचप्रमाणे किती रुपयांना झाला आहे याचीही नोंद केलेली असते एकदा का खरेदीखत झाले की ही सर्व माहिती फेरफार वर लागते आणि मग त्यानंतर सातबारा उताऱ्या वरती नवीन मालकाची नोंद होते

3. खाते उतारा किंवा आठ

एखाद्या शेतकऱ्याची जमीन ही वेगवेगळ्या गट क्रमांक मध्ये विभागलेली असते. या सर्व गट क्रमांक मधील शेतजमीनीची माहिती एकत्रितपणे ज्यावर नोंदवलेली असते ते म्हणजेच खाते उतारा किंवा आठ अ उतारा. एखाद्या गावात तुमच्या मालकीची जमीन ही कोणत्या गट क्रमांकात आहे ही माहिती तुम्हाला आठ अ उताऱ्याद्वारे मिळते. या कारणामुळे जमिनीचे मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी आठ-अ चा उतारा हा महत्त्वाचा मानला जातो. 1 ऑगस्ट 2020 पासून महाराष्ट्र सरकार महसूल विभागने डिजिटल स्वाक्षरी असलेला उतारा उपलब्ध करून दिलेला आहे. यामुळे दरवर्षी अपडेटेड खाते उतारा डाऊनलोड करता येतो.

4. जमीन मोजणी चा नकाशा

जमीन मालकी हक्क बाबत एखादा वाद निर्माण झाला, तर अशा वेळेस त्या जमिनीची मोजणी केली जाते. जर जमीन मोजणीचा नकाशा तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्या जमिनीवरील तुमचा मालकी हक्क प्रस्थापित करू शकता. यामुळे जमीन मोजणीचे नकाशे जतन करून ठेवणे गरजेचे आहे. एखाद्या ठराविक गट नकाशातील जमीन कोणाच्या नावावर आहे, त्या शेतकऱ्याचे नाव काय आहे आणि त्या शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन आहे याची सविस्तर माहिती दिलेली असते. त्याप्रमाणे तुमच्या शेत जमिनीला लागून कोणते गट क्रमांक आहे त्याची माहिती दिलेली असते, म्हणजे शेजारी कोणत्या शेतकऱ्याचे शेत आहे हे यामध्ये कळते.

5. जमीन महसूल याच्या पावत्या

दरवर्षी जमिनी महसुलची एक पावती दिली जाते ती पावती सुद्धा तुम्हाला तुमचा जमिनीवरील मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाते. या पावती सांभाळून ठेवल्या तर वेळ प्रसंगी मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी त्या पावत्यांचा पुरावा म्हणून वापर करता येऊ शकतो.

6. जमिनीबाबतचे पूर्वीचे खटले

तुमच्या मालकीच्या असलेल्या एखाद्या जमिनी बाबत पूर्वी कोणतीही केस किंवा खटला चालू असेल तर या केस संबंधित कागदपत्रे, त्यातील जबाबाच्या प्रती, निकाल पत्र ही कागदपत्रे जपून ठेवली गेली पाहिजे. याचा वापर करून जमिनीवर मालकी हक्काचा दावा करता येऊ शकतो.

7. प्रॉपर्टी कार्ड

बिगर शेती जमिनीवर जर तुमची मालमत्ता असेल तर त्या जमिनीच्या मालकी हक्क विषयी जागरूक असने गरजेचे आहे. अशा प्रकारच्या शेत बिगर शेत जमिनीवर मालकी हक्क सांगणारा सरकारी दस्ताऐवज म्हणजेच प्रॉपर्टी कार्ड. सातबारा उतारा वर ज्याप्रमाणे एखाद्या शेतकऱ्याच्या नावावर किती शेत जमीन आहे याची माहिती दिलेली असते, त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती बिगर शेत जमीन आहे याची माहिती प्रॉपर्टी कार्ड वर दिलेली असते. प्रॉपर्टी कार्ड हे ऑनलाईन सुद्धा काढता येते. एखाद्या व्यक्तीच्या नावावर बिगर शेत जमीन क्षेत्रात किती स्थावर मालमत्ता आहे याची माहिती प्रॉपर्टी कार्डवर नोंदवलेली असते.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठीयेथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा            

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top