Court Summons कोर्टाने दिलेल्या तारखेला गैरहजर राहिल्यास चालते का???

  1. दिवाणी दावा

दिवाणी दाव्यामध्ये प्रत्येक तारखेला कोर्टासमोर हजर नाही राहिले तरी चालते, कारण दिवाणी दाव्यामध्ये केस संबंधीची सर्व कामे हे आपले वकील बघत असतात, तसेच फक्त साक्ष देण्यासाठी आपल्याला कोर्टात हजर राहावे लागते. आपल्या केस मध्ये काय चालले आहे हे पाहण्यासाठी देखील आपण कोर्टात उपस्थित राहू शकतो, यासाठी आपल्याला असा नियम नाही की आपण वैयक्तिकरित्या हजर राहिले पाहिजे. पण, वादी जर कोणत्याच तारखेला कोर्टासमोर हजर राहीला नाही, तर अशा वादीचा दावा कोर्ट काढून टाकू शकतात.

दिवाणी दावे यासंबंधी ऑर्डर 3 नियम 1 आणि नियम 2 नुसार नियम 1 मध्ये असे दिले आहे की, कोर्टामध्ये जेव्हा गरज असेल तेव्हा वकील साहेबांनी पक्षकारांना उपस्थित राहायला सांगितले आहे, तेव्हा त्यांनी उपस्थित राहने गरजेचे आहे. म्हणजेच दिवानी दावे संदर्भात पक्षकाराने वैयक्तिकरित्या कोर्टात उपस्थित राहिलेच पाहिजे असे नाही.

मात्र नियम 2 मध्ये असे सांगितले आहे की जर कोर्टाने एखादे व्यक्तीस वैयक्तिकरित्या कोर्टामध्ये हजर राहण्याची नोटीस पाठवली असेल तर त्याने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

त्याचबरोबर एखाद्या दाव्यामध्ये आपण आपले पुरावे किंवा म्हणणे कोर्टामध्ये वेळेवर पोहोचवू शकलो नाही तर कोर्ट देखील ऑर्डर पारित करू शकत.

2. फौजदारी प्रकरण

जेव्हा आपण एखादी FIR पोलीस स्टेशनमध्ये दाखल करतो, आणि त्याबद्दल चार्जशीट कोर्टात दाखल होते, याबाबतीत जेव्हा कोर्ट केस सुरू असेल तेव्हा तुम्ही जरी साक्षीदार असाल तेव्हा तुमच्या साक्षीदार व्यतिरिक्त कोणतीही भूमिका नसते, तसेच प्रक्रिया प्रकरणांमध्ये तुम्हाला जर कोर्टाने समन्स पाठवले असेल तर, त्या तारखेला तुम्हाला कोर्टात हजर रहावेच लागते. या तारखेला तुम्ही हजर राहिला नाही तर कोर्ट तुमच्या विरुद्ध वॉरंट काढू शकते. या वॉरंट विरोधात तुम्ही जामीन पात्र वॉरंट काढून तुम्ही जर कोर्टात हजर राहिला नाही, तर मात्र कोर्ट तुमच्यावर अजामीन पात्र वॉरंट काढून तुम्हाला पोलिसांमार्फत कोर्टात हजर राहण्याचे आदेश देते, आणि कोर्टासमोर तुमची साक्ष घेतली जाते.

एखादी व्यक्ती जर जेलमध्ये असेल तर त्या व्यक्तीस कोर्टामध्ये हजर राहण्याची जबाबदारी पोलिसांची असते, मात्र तुम्ही जर जामीनावर बाहेर असाल तर ती जबाबदारी तुमची असते. तसेच तुम्ही जामिनावर असताना जर कोर्टात हजर राहिला नाही तर तुमचा जामीन हा कोर्टातर्फे रद्द केला जाऊ शकतो.

एखादी फौजदारी केस तुमच्याविरुद्ध दाखल असताना तुम्ही जेलमध्ये असाल किंवा जेलच्या बाहेर जामिनावर असाल तर हे असे प्रकरण असते.

परंतु काही कारणामुळे तुम्हाला कोर्टासमोर हजर राहणे शक्य नसेल तर तुम्ही वकील साहेबांकडे माफीचा अर्ज देऊन कोर्टामध्ये गैरहजर राहू शकता.

तुम्ही जर वेळोवेळी असं माफीनामा देऊन गैरहजर राहत असाल तर कोठे मंजूर करत नाही आणि अंतिम निर्णयाच्या वेळेस फ्रेमिंग ऑफ चार्जेसच्या नियमाप्रमाणे आरोपीला कोर्टासमोर हजर राहणे बंधनकारक असते.

या सर्व कायदेशीर तरतुदी असून आपली जर केस चालू असेल तर, आपण आपला दावा असल्यामुळे आपली उपस्थिती आपण कोर्टात दाखवल्यास वकील सुद्धा या प्रकरणांमध्ये चांगले काम करतात आणि आपले प्रकरण लवकरच निकाली लागते.

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top