Dr Punjabrao Deshmukh Scholarship डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना २०२३

आवश्यक कागदपत्रे:

शिष्यवृत्ती अर्जासोबत विद्यार्थ्याने पुढील कागदपत्र जोडणे आवश्यक आहे:-

  • महाराष्ट्राचा रहिवासी असल्याबाबत अधिवास प्रमाणपत्र,
  • विद्यार्थी मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी मराठा जातीचा असल्याचा पुरावा / जातीचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला) फॉर्म नं.१६,
  • उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला) व आयकर विवरण पत्र परिच्छेद (इ) (२) व (३) मध्ये नमूद केल्याप्रमाणे,
  • इयत्ता १२ वीचा शाळा / महाविद्यालय सोडल्याचा दाखला,
  • संस्थेत प्रत्यक्ष प्रवेश मिळाल्याचे संबंधित संस्थेचे पत्र,
  • आधार कार्ड, पॅन कार्ड (पालकाचे) व आधार संलग्न बँक खात्याचा तपशील.
  • संपूर्ण गुणपत्रिका, इ.१२वी / डिप्लोमा / पदवी इत्यादी परीक्षांच्या सर्व वर्षाच्या

Dr Punjabrao Deshmukh Scholarship अर्ज करण्याची पध्दती :-

या योजने अंतर्गत शिष्यवृत्तीसाठी या निवेदनासोबत दिलेल्या विहित नमुन्यातील अर्ज नमूद विहित कालावधीत समक्ष / पत्राद्वारे व्यवस्थापकीय संचालक सारथी, पुणे येथे सादर करावा. या योजने अंतर्गत शिष्यवृत्तीसाठी ३०० पात्र विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास पुन्हा जाहिराती द्वारे अर्ज मागवून ३०० विद्यार्थ्यांचा कोटा पुर्ण करण्यात येईल.

या योजने अंतर्गत शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्याला इतर कोणत्याही शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही. तसेच, विद्यार्थ्याला संबंधित संस्थेत मिळणारे विद्यावेतन, फेलोशिप अन्य कोणतेही लाभ अभ्यासक्रम कालावधीत मिळत असल्यास ते वजा करुन उर्वरित शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येईल.

विहीत केलेल्या विद्यापीठ / संस्थांमध्ये प्रवेशित अभ्यासक्रमासाठी अर्ज करताना नमूद केलेला अभ्यासक्रम विहीत कालावधीत पुर्ण करणे विद्यार्थ्यांवर बंधनकारक असेल.

अभ्यासक्रम अर्धवट सोडल्यास शिष्यवृत्तीची संपूर्ण रक्कम संबंधित विद्यार्थी/पालक/ कुटुंबाकडुन वरील अधिनियमाद्वारे वसूल करण्यात येईल.

विद्यार्थ्याने शिष्यवृत्ती मिळण्यासाठी चुकीची अथवा दिशाभूल करणारी माहिती दिली असल्याचे आढळून आल्यास तो फौजदारी गुन्ह्याखाली कारवाईस पात्र ठरेल व त्याला अदा करण्यात आलेली शिष्यवृत्ती महसूली अधिनियमाखाली वसूल पात्र राहील.

या योजनेअंतर्गत निवड केलेल्या विद्यार्थ्यांच्या अंतिम निवडी बाबतचे आदेश सारथीच्या स्तरावरुन निर्गमित करण्यात येतील.

सदर शिष्यवृत्तीच्या बाबत महाराष्ट्र शासनाच्या सारथी संस्थेने घेतलेला निर्णय अंतिम असेल.

शिष्यवृत्तीसाठी निवड प्रक्रिया ही वरील नमूद केलेल्या व वेळोवेळी सुधारणा केलेले पध्दती प्रमाणे होईल.

तसेच विहित नमुन्यातील अर्जाचा नमुना सारथी संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विहित नमुन्यातील अर्ज संकेतस्थळावरून डाऊनलोड करुन तो परिपूर्ण भरुन आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करावा..

तसेच अर्ज विहित नमुन्यामध्ये सादर करणे आवश्यक आहे. अपुर्ण आणि विहित मुदतीनंतर प्राप्त होणारे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top