किती मिळेल शिष्यवृत्तीचा लाभ:
यु.एस.ए आणि इतर देशांसाठी तसेच यू. के. साठी प्रती वर्षासाठी केंद्र शासनाने निश्चित केल्याप्रमाणे, National Overseas Scholarship Scheme या योजनेसाठी ठरविलेल्या दराने किंवा विद्यार्थ्यांस प्रत्यक्ष येणारा खर्च यापैकी कमी असणारी रक्कम अनुज्ञेय असेल. अमेरिकेत वा इतर देशात शिकत असलेल्या विद्याथ्यांकरिता प्रति वर्षी १५,४००/- अमेरिकन डॉलर मिळतील. तसेच युके (UK) मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांस प्रति वर्षी ९,९००/-जी.बी.पी. उपलब्ध करून दिले जातील. जेव्हा जेव्हा केंद्र शासन National Overseas Scholarship Scheme द्वारे या दरात बदल करेल तेव्हा तेव्हा या दरांमध्ये बदल करण्यात येईल.
विद्यार्थ्यांस परदेशी शिक्षण संस्थेमार्फत किंवा इतर कोणत्याही यंत्रणेमार्फत मिळणारी शिष्यवृत्ती इतर कोणत्याही प्रकारचे आर्थिक लाभ किंवा शिकविण्याबाबतचे मानधन किंवा फेलोशिप किंवा रिसर्च असोसिएट म्हणून मिळणारी ही रक्कम देय होणाऱ्या या शिक्षण फी वा एकूण देय रकमेमधून कपात करण्यात येईल. विद्यार्थ्यास परदेशातील विद्यापीठामध्ये प्रवेश घेण्यासाठी व अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर भारतात परत येण्यासाठी कमीत कमी कालावधीचा आणि जवळच्या मार्गाचा (Shortest Route) इकॉनॉमी क्लासचा विमान प्रवासाचा दर (Air Travel Expenditure) दिला जाईल.
विद्यार्थी / उमेदवारास खालील बाबींवर होणाऱ्या खर्चाचा भार हलका व्हावा म्हणून दरवर्षी यु. एस. ए आणि इतर देशांसाठी तसेच (यू. के. वगळून) फक्त १५०० युएस् डॉलर्स, आणि यु. के. साठी फक्त ११०० जीबीपी इतका निर्वाह भत्ता / इतर खर्च आकस्मिक खर्च (Contingency Expenditure) म्हणून देण्यात येईल जसे की, आवश्यक ती क्रमिक पुस्तके, वह्या व स्टेशनरी, प्रबंध अहवाल तयार करणे, टायपिंग, बायडिंग, स्थानिक भेटी व इतर अभ्यास सहली प्रवास खर्च, प्रबंधासाठी आवश्यक खर्च, इतर प्रासंगिक खर्च,
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.