तुकडेबंदी कायदा तुकडे पाडण्यास मनाई

तुकड्याचे हस्तांतरण करता येत नाही

तुकडेबंदी कायदा तुकडे पाडण्यास मनाई कोणत्याही तुकड्यांचे हस्तांतरण करता येत नाही. तुकड्याला लागून असलेल्या भू-मापन क्रमांकाच्या मालकास मात्र अशा तुकड्यांचे हस्तांतरण करता येते. नजीकच्या धारकास तुकड्यांचे हस्तांतरण झाल्याने दोन जमिन तुकडे एकाच मालकीचे होतात. व एकत्रीकरण होते. म्हणून तुकडेबंदी कायदा नुसार परवानगी दिली आहे.

राज्य शासन, बँक, सहकारी संस्था दिलेल्या कर्जाबद्दल तारण म्हणून धारकास तुकडा गहाण ठेवता येतो. तसेच त्यांचे या बाबतीत हस्तांतरणही करता येते. कोणताही जमिनीचा तुकडा ठरल्यानंतर तुकडा लगतची जमिन कसणा-या व्यक्ती व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस पट्ट्याने देता येणार नाही.

गुंठेवरी एक-दोन गुंठे जमीन खरेदी विक्री बंदी दस्त नोंदणी होणार नाही व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

तुकडेबंदी कायदा तुकडे पाडण्यास मनाई

कोणत्याही जमिनीचा हस्तांतरण किंवा विभागणी तुकडा निर्माण होईल. अशा रीतीने करता येणार नाही. हस्तांतरण हुकूमनामा वारसा हक्क आणि इतर कारणांनी दोन किंवा अधिक व्यक्तींना जमिनीत हिस्से मिळण्याचा हक्क असतो. अर्थात त्यासाठी अशा व्यक्ती मध्ये जमिनीची विभागणी करावी लागते अशी विभागणी करताना तुकडा न होईल अशा पद्धतीने तो करावयाची आहे.

चुकीमुळे नोंदलेल्या दस्त ऐवजाप्रमाणे हुकूमनाम्या प्रमाणे वगैरे तलाठ्यांना जेव्हा तुकडा असलेल्या जमिनीचा फेरफार करावा लागेल तेव्हा त्यांनी तो फेरफार आवश्यक करायचा आहे. अधिनियमाचा भंग म्हणून फेरफारच नोंदवायचा नाही. असे तलाठयांनी करता कामा नये.

कारण असे केले तर तुकडेबंदी व तुकडेज़ोड कायद्याचा भंग झाल्याने असे व्यवहार अभिलेखात नोंदवले जाणार नाहीत तेव्हा अशा व्यवहारात तुकडा असला तरी फेरफार तलाठी नी करायचा आहे.

फेरफार केल्यानंतर गाव नमुना सहामधील सदर चारमध्ये हस्तांतरण तुकडेबंदी व तुकडे जोड कायद्याचा भंग करून अशी नोंद पेन्सिल ने ठेवायची आहे व तशीच पेन्सिल नोंद संबंधित गाव नमुना सातमध्ये इतर हक्क सदरी ठेवायची आहे.

प्रमाणं अधिका-यांनी फेरफार तपासताना अशा तुकड्यांच्या हस्तांतरणाची दखल घेऊन तुकडेबंदी व तुकडे जोड कायद्याखाली असे हस्तांतरण निरर्थक ठरविण्याची कारवाई करण्यासाठी तहसीलदाराकडे तपशीलासह करावयाचा आहे व नोंद प्रमाणित करायची आहे.

तुकडयांचे हस्तांतरण केल्याबद्दल शास्ती

तुकडेबंदी अधिनियमाचे विरुद्ध जमिनीचे तुकडे पडतील अशा रीतीने केलेली विभागणी किंवा हस्तांतरण तसेच अस्तिवात असलेल्या तुकड्यांचे हस्तांतरण (लगतचा धार सोडून) निरर्थक होईल, जेव्हा अशा बाबतीत जिल्हाधिकारी निर्देश देईल तेव्हा जमिन मालक रुपये २५०/- पेक्षा जास्त नाही अशी रक्कम दंड म्हणून भरण्यास पात्र ठरेल हे निर्देश जिल्हाधिकारी यांनी घ्यावयाचे आहेत.

जमिनीच्या तुकड्यांचे हस्तांतरण किंवा तुकडा होईल अशी विभागणी निरर्थक ठरविल्यावर त्या जामिनीचा कब्जा किंवा भोगवटा ज्या व्यक्तीकडे अधिकृतपणे आहे त्या व्यक्तीला उक्त जमिनीच्या तुकड्यातून काढून लावता येते. (९)

याच कायदा संबंधी महत्त्वाचा कायदा जमिन एकत्रीकरण कायदामधील महत्त्वाच्या तरतुदी माहिती आपण पुढील भागात घेणार आहोत. या करता आपण माहिती असायलाच हवी वेबसाईटला नियमीतपणे भेट देत जावी .

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top