Sayajirao Gaikwad Sarathi Scholarship सयाजीराव गायकवाड – सारथी गुणवंत विद्यार्थी परदेश उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना | जाणून घेऊया संपूर्ण माहिती |

Sayajirao Gaikwad Sarathi Scholarship असा असेल अभ्यासक्रम कालावधी

     पीएचडी-4 वर्ष किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेल तो.

    पदव्युत्तर पदवी 2 वर्ष किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेत तो.

     पदव्युत्तर पदविका 1 वर्ष किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेल तो.

Sayajirao Gaikwad Sarathi Scholarship विद्यार्थ्यास मिळणारे लाभ

  • परदेशातील शैक्षणिक संस्थेने पत्रामध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक कालावधीपासून लागू केलेली संपूर्ण शिक्षण फी, अभ्यासक्रमासाठी नजिकच्या मार्गानी इकॉनॉमी क्लास विमान प्रवास भाडे (परतीच्या प्रवासासह) निर्वाह भत्ता, वैयक्तिक आरोग्य विमा यावरील विद्यार्थ्याने प्रत्यक्ष केलेला खर्च विहित केलेल्या वित्तीय मर्यादेत मूळ शुल्क भरणा पावती, प्रवासाचे मूळ तिकिट, मूळ बोर्डिंग पास, परतीच्या प्रवासाचे तिकिट इत्यादी तपासून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर भारतीय रुपयांमध्ये प्रतिपूर्ती सारथी संस्थेमार्फत विद्यार्थ्यांकडून प्रस्ताव प्राप्त झाल्याच्या १५ कार्यालयीन दिवसाच्या आत जमा करण्यात येईल.
  •    सर्वसाधारण पदव्युत्तर पदवीसाठी २ वर्ष किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेल व पदव्युत्तर पदविकासाठी १ वर्ष किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कभी असेल त्या अभ्यासक्रमासाठी नजीकच्या मार्गाने इकॉनॉमी क्लास विमान भाडे परतीच्या भाड्यासह, शिक्षण शुल्क, निर्वाह भत्ता, वैयक्तिक आरोग्य विमा यासह एका विद्यार्थ्यामागे प्रतिवर्षी रु. ३० लाखाच्या मर्यादेत, तर पीएचडीसाठी ४ वर्ष किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेल त्यासाठी प्रतिविद्यार्थी प्रतिवर्षी रु. ४० लाखाच्या मर्यादेत शाखा/अभ्यासक्रम निहाय मार्गदर्शक तरतूदीनुसार परदेशी शिष्यवृत्ती अदा करण्यात येईल.
  •    प्रवेश घेतलेल्या संबंधित शैक्षणिक संस्थेने ठरवून दिलेल्या अथवा भारत सरकारच्या DOPT विभागाने विदेशी शिष्यवृत्तीसाठी ठरवून दिलेल्या दराप्रमाणे येणारा खर्च भारत सरकारच्या इंडियन ओव्हरसिज स्कॉलरशिप या योजनेअंतर्गत देण्यात येत असलेल्या दरवर्षी युएसए व इतर देशांसाठी (युके वगळून) १५४०० युएस डॉलर्स आणि युकेसाठी ९९०० जीबीपी इतक्या रकमेच्या मर्यादेत निर्वाह भत्ता संबंधित विद्यार्थ्याच्या परदेशातील वैयक्तिक खात्यामध्ये जमा केला जाईल. सदर निर्वाह भत्याची रक्कम ही उपरोक्त नमूद पदव्युत्तर पदवी / पदविका असलेल्या प्रतिवर्षी रु.३० लाखाच्या व पीएचडीसाठी असलेल्या प्रतिवर्षी रु. ४०  लाखाच्या मर्यादेमध्ये अंतर्भूत आहे.
  •     विद्यार्थ्यास परदेशी शिक्षण संस्थेमार्फत किंवा इतर कोणत्याही यंत्रणेमार्फत मिळणारी शिष्यवृत्ती, इतर कोणत्याही प्रकारचे आर्थिक लाभ किंवा शिकविण्याबाबतचे मानधन किंवा फेलोशिप किंवा रिसर्च असोशिएट म्हणून मिळणारी ही रक्कम देय होणाऱ्या शिक्षण शुल्क वा एकूण देय रकमेमधून कपात करण्यात येईल.
  •    सुरुवातीस परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणे आणि विहीत कालावधीत अभ्यासक्रमपूर्ण केल्यानंतर त्वरीत कालमर्यादेत भारतात परत येण्यासाठी भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे नजिकच्या मार्गाने इकॉनॉमी क्लास विमानप्रवासभाडे देण्यात येईल. त्यासाठी विमान प्रवासाचे मूळ तिकीट, मूळ बोर्डींग पास, परतीचे प्रवास भाडे मिळण्यासाठी अभ्यासक्रम विहीत कालावधीत यशस्वीपणे पूर्ण केल्याच्या पुरावा इ. कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे.
  •    विद्यार्थ्यांस परदेशात राहण्याच्या कालावधीसाठी विद्यापीठाने ठरवून दिल्यानुसार वैयक्तिक आरोग्य विमा काढणे अनिवार्य राहील. यासाठीचा संबंधीत विद्यापीठाच्या निकषानुसार किमान खर्च सारथी संस्थेकडून अनुज्ञेय राहील.
  •    वरीलप्रमाणे शिक्षण शुल्क, निर्वाहभत्ता, वैयक्तिक आरोग्य विमा आणि यासाठी निर्धारीत केलेल्या दरापेक्षा होणारा जास्तीचा खर्च विद्यार्थी / उमेदवारास स्वतः सोसावा लागेल व अशा प्रकारचे हमीपत्र विद्यार्थ्यास व पालकास अर्जासोबत द्यावे लागेल.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top