Foreign Scholarship परदेशात पदव्युत्तर पदवी व पी.एच.डी. अभ्यासक्रमासाठी अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती |

आवश्यक कागदपत्रे:

I. विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज.

II. अर्जदार अल्पसंख्याक असल्याबाबतचा पुरावा. सक्षम प्राधिकाऱ्यानी दिलेला उत्पन्नाचा दाखला.

IV. पदवी/पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे पुरावे (सनद/गुणपत्र)

V. परदेशातील QS World Ranking २०० च्या आतील शैक्षणिक संस्थेमध्ये विनाअट प्रवेश मिळाला असल्याबाबतचे पत्र (Unconditional) ऑफर लेटर.

VI. ज्या विद्यापिठामध्ये प्रवेश मिळाला आहे त्याच्या सविस्तर माहिती पत्रकाचे पत्र Prospect

VII. आवश्यक ते करारनामे व हमीपत्रे.

VIII. संपूर्ण अभ्यासक्रम होण्यासाठी वर्षनिहाय खर्चाचे अंदाजपत्रक. जाण्या-येण्याचा विमान प्रवास, राहण्याचा खर्च याचा समावेश असावा.

IX. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी परदेशातील विद्यापिठामध्ये प्रवेश घेणार असेल त्या विद्यापिठास व अभ्यासक्रमास भारतीय आयुर्विज्ञान परिषदेची मान्यता असणे आवश्यक आहे.

Χ. नोकरीमध्ये असलेल्या उमेदवारांनी तो जेथे नोकरी करतो त्या यंत्रणेचे (Organization/ Employer) नाहरकत प्रमाणपत्र दाखल करणे अनिवार्य आहे.

XI. विद्यार्थी, शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या कालावधीसाठी किंवा शिक्षण त्यापूर्वी पूर्ण झाल्यास जो कालावधी लागेल, या दोघांपैकी जो कमी आहे, त्या कालावधी पुरतेच परदेशात राहण्याचे बंधपत्र (Bond) राज्य शासनास तसेच परदेशातील भारतीय दूतावासास लिहून देईल. या आवश्यक कालावधीपेक्षा जास्त कालावधीकरीता परदेशात राहण्यास विद्यार्थ्यांस परवानगी मिळणार नाही

XII. उमेदवारास / विद्यार्थ्यांस शासनाने विहीत करुन दिलेल्या नमुन्यात Record Release Consent Form हा बंधपत्राच्या स्वरुपात द्यावा लागेल.

XIII. ज्या विद्यार्थ्यांना परदेशी शैक्षणिक संस्थांकडून Unconditional Offer Letter मिळालेले असेल, त्यांनाच ही शिष्यवृत्ती अनुज्ञेय राहील. यासाठी conditional Offer Letter  गृहीत धरले जाणार नाही.

अधिकृत शासन निर्णय येथे पहा

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top