Free Education Scheme Maharashtra व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीने व मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी प्राप्त व्हाव्या, तसेच महिला सक्षमीकरणांतर्गत आर्थिक पाठबळाअभावी व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्यापासून मुली वंचित राहू नयेत, यामुळे शासनाने पात्र लाभार्थींसाठी नवीन निर्णय घेतला आहे.
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
Free Education Scheme Maharashtra या अभ्यासक्रमासाठी मिळेल मोफत प्रवेश:
औषधी द्रव्य विभाग, कृषी व पशुसंवर्धन, उच्च व तंत्र शिक्षण, वैद्यकीय, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाच्या ज्या संस्था आहेत, त्यामधील व्यावसायिक अभ्यासक्रमांना विद्यार्थिनींना मोफत प्रवेश मिळेल.
उत्पन्न मर्यादा:
ज्या विद्यार्थ्यीनींना व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यीनींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे.
त्यासाठी संबंधित यंत्रणेद्वारे लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनींना उत्पन्न पुरावा द्यावा लागेल.
कुठे मिळेल प्रवेश?
अनुदानित अशासकीय महाविद्यालये, शासकीय महाविद्यालय, तंत्रनिकेतन, विद्यापीठ, अंशतः अनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालये, अभिमत विद्यापीठ अंतर्गत उपकेंद्र मधील जे व्यावसायिक अभ्यासक्रम आहे त्यासाठी या योजनेचा लाभ घेता येईल.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.