RTE Admission RTE ऍडमिशन 2023-2024 लवकरच सुरू.

RTE Admission

RTE Admission या लेखामध्ये आपण पाहणार आहोत RTE म्हणजे नक्की काय आहे , आरटी ऍडमिशन साठी कोण कोणती कागदपत्रे लागतात, RTE साठी पात्रता काय राहील, कोणते विद्यार्थी अर्ज करू शकतात व आणखी बरीच माहिती आज आपण पाहणार आहोत.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मित्रांनो आज आम्ही तुम्हाला RTE ऍडमिशन बद्दल माहिती देणार आहोत, हे ऍडमिशन्स फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणार आहेत. आम्हीही तुम्हाला लवकरच तारीख कळवू.

हा लेख तुम्ही सर्वांना शेअर करा म्हणजे RTE चा फॉर्म भरण्यापूर्वी यासाठी काय काय माहिती लागते ही सर्व माहिती तुम्हाला या लेखामध्ये भेटेल.

RTE म्हणजे नक्की काय आहे?

मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की RTE म्हणजे नक्की काय आहे? तर RTE म्हणजे राईट टू एज्युकेशन या योजने अंतर्गत ज्या काही खाजगी शाळा असतील त्या मध्ये तुम्हाला 25% कोठा (reservation) असतो . तिथं तुम्हाला मोफत शिक्षण मिळते. आता हे कितवी पर्यंत मिळते असे तुम्हाला वाटत असेल तर नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनियर केजी, यामधील विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत मोफत शिक्षण दिले जाते. अशा प्रकारची ही योजना असते.

हे वाचले का?  दहावी बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

RTE Admission हे मोफत शिक्षण मिळवण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरावा लागतो. अशा पद्धतीने ऑनलाईन फॉर्म जास्ती भरले गेल्यास यामध्ये लॉटरी पद्धतीने नंबर काढला जातो, व यामध्ये आपला नंबर आल्यास आपल्याला मोफत शिक्षण दिले जाते .

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

RTE ऍडमिशन साठी कोणती बालके पात्र असतात?

दुर्बल घटका अंतर्गत ज्या कुटुंबाचे एकत्र वार्षिक उत्पन्न रुपये एक लाख पर्यंत आहे अशा पालकांची बालके ,वंचित गटा अंतर्गत अनुसूचित जाती ,अनुसूचित जमाती आणि सर्व जाती धर्मातील विकलांग बालके .

कोणत्या प्रकारच्या शाळा प्रवेशासाठी पात्र आहेत? (माध्यम व बोर्ड)

सर्व माध्यमाच्या, सर्व बोर्डाच्या, (राज्य मंडळ, CBSE, ICS, व IB ) विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयं अर्थसहाय्यत, प्राथमिक सर्व शाळा, जिथे वर्ग पहिली किंवा पूर्व माध्यमिक स्तरावरील आहे . (मदरसा, मक्तब, धार्मिक पाठशाळा, अल्पसंख्यांक शाळा वगळून)

हे वाचले का?  Maratha Karja Yojana अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजनेबद्दल संपूर्ण माहिती: पहा अर्ज, पात्रता व आवश्यक कागदपत्रे…

जर तुमची लॉटरी लागली, तर शाळा प्रवेशाच्या वेळेस सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे, अन्यथा मिळालेला प्रवेश रद्द होऊ शकतो याची नोंद घ्यावी.

ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची वेबसाईट खाली दिलेली आहे.

सदरचा अर्ज संकेतस्थळावर (वेबसाईटवर) ऑनलाईन भराण्यासाठी येथे क्लिक करा

RTE ऍडमिशन साठी वयाची अट

सन 2023-24 या शैक्षणिक सत्रा RTE 25% प्रवेशासाठी बालकाचे कमाल वय

अ. क्र प्रवेशाचा वर्गवयोमार्यादा दि. 31 डिसेंबर 2023 रोजी वय
1 प्ले ग्रुप/ नर्सरी01/07/2019 – 31/12/2020 4 वर्ष 5 महीने 30 दिवस
2 जुनीयर केजी 01/07/2018 – 31/12/2019 5 वर्ष 5 महीने 30 दिवस
3 सीनियर केजी 01/07/2017 – 31/01/2018 6 वर्ष 5 महीने 30 दिवस
4 इयत्ता 1 ली 01/07/2016 – 31/12/2017 7 वर्ष 5 महीने 30 दिवस

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

हे वाचले का?  Lek Ladki Yojana मुलींना लखपती करणारी राज्य शासनाची लेक लाडकी योजना | जाणून घेऊ या काय आहे योजना |

पालक किती शाळा व कोणत्या माध्यमासाठी अर्ज करू शकतात ?

ऑनलाइन माहिती भरताना पालकांना त्यांच्या रहिवासी क्षेत्र पासून एक किलोमीटर व तीन किलोमीटर आणि अधिक अंतरापर्यंतच्या उपलब्ध असणाऱ्या शाळांपैकी जास्तीत जास्त कोणत्याही दहा शाळांचे’ पर्याय निवडता येतील तसेच उपलब्ध माध्यमातून शाळेचे माध्यम निवडण्याचे स्वातंत्र्य पालकांना राहील.

तुम्ही हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top