Gram Vikas Nidhi गावाच्या विकासासाठी किती प्रकारचे निधी उपलब्ध असतात?

Gram Vikas Nidhi ग्रामविकास आराखड्यातील ग्रामसभांचे महत्त्व काय असतं?
त्याचं नियोजन कसं करायला हवं?

गाव आराखडा तयार करण्यासाठी गाव पातळीवरती संसाधन गट तयार करणे आवश्यक आहे. संसाधन गट म्हणजे काय तर ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्याच्या बरोबरीने गावांमध्ये शिक्षक असतील, गावामध्ये कोणी उद्योजक असतील, गावामध्ये कोणी जाणकार असतील, गावामध्ये कोणी ज्येष्ठ नागरिक असतील, किंवा वेगवेगळ्या पद्धतीने आरोग्य खात्यामध्ये काम करायला लोक असतील. या सगळ्यांचा मिळून एक संसाधन गट तयार होतो.

शासकीय योजना चे अधिकारी आणि हा संसाधन गट व महिला यांनी एकत्र बसून त्याचे विचार मंथन करायचे, मग जी तुमची माहिती एकत्रित झालेली आहे त्याचे एकत्रीकरण करून ही माहिती पुढे पाठवायची, तर अंतिम ग्रामसभा जी आपण घेतो म्हणजे ज्याच्या मध्ये ग्राम विकास आराखडा मंजूर केला जातो,

त्याच्या आधी वेगवेगळ्या ग्रामपंचायतिने ग्रामसभा घ्याव्यात, अशा प्रकारचं आपल्याला शासन निर्णयामध्ये मार्गदर्शन तत्त्व दिलेल आहे.

तर त्याच्या आधी म्हणजे साधारण अंतिम ग्रामसभा मंजुरीची तारीख जर 30 डिसेंबर असेल तर 25 डिसेंबर पासून या ग्रामसभा सुरू कराव्यात. त्याच्यामध्ये –

कोण कोणत्या ग्रामसभा घ्याव्यात?

1.महिलांची ग्रामसभा घ्यावी, ज्याच्यामध्ये महिला बचत गटांचे काही प्रश्न असतील, महिलांचे काही समस्या असतील.

2. बाल ग्रामसभा सुद्धा घ्यावी. उदाहरणार्थ आपल्याकडे काय होतं की 18 वर्षे ते त्याच्या पुढच्या लोकांना नागरिकांना ग्रामसभेमध्ये यायला परवानगी असते, अठरा वर्षाच्या आतले येत नाहीत मग त्यांचे प्रतिनिधित्व कसे मिळणार म्हणून पण त्यासाठी बाल ग्रामसभा घ्यावी.

त्याच्यात प्राथमिक शाळेतील विद्यार्थी असतील माध्यमिक शाळेतील विद्यार्थी असतील कॉलेज असेल तर कॉलेजमधले विद्यार्थी असतील अठरा वर्षाच्या खालच्या विद्यार्थ्यांच्या समस्या आणि प्रतिनिधित्व या विकास आराखड्यामध्ये यावं म्हणून त्यांची देखील ग्रामसभा ही अंतिम ग्रामसभेच्या आधी आपल्याला घ्यावी लागते.

3. वंचित घटकांची ग्रामसभा गावामध्ये जेवढे वंचित घटक आहेत मग ते अनुसूचित जाती जमाती मधले असतील किंवा काही योजना पासून वंचित राहिलेले असतील.

याची देखील एक ग्रामसभा घ्यावी मग त्यांचे प्रश्न काय आहेत त्यांच्या समस्या काय आहेत व त्याला लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये निधी कसा उपलब्ध करून द्यायचा हा हि मुद्दा या वंचित घटकांच्या ग्रामसभेमध्ये येतो आणि अजून असे मार्गदर्शक तत्व आहे की,

4. वेगवेगळे गावातले जे वॉर्ड असतात तर त्या निहाय देखील ग्रामसभा घ्यावी.

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top