Title Clear Property Documents ‘टायटल क्लिअर’ जमीन म्हणजे नेमकं काय?

Title Clear Property Documents टायटल चे डॉक्युमेंट कुठले मालकी हक्काचे डॉक्युमेंट कुठले तर याबद्दल सविस्तर माहिती आपण खाली पाहू.

खरेदीखत

खरेदीखत हे सर्वात पहिले डॉक्युमेंट आहे ज्या व्यक्तीकडे खरेदी खत आहे त्याच्याकडे जमिनीची मालकी आहे असे समजले जाते खरेदीखत हा मालकी हक्काचा दस्त असतो.

गिफ्ट डीड

दुसरे डॉक्युमेंट म्हणजे गिफ्ट डीड. एखाद्या व्यक्तीकडे जर गिफ्ट डिडने एखाद्या संपत्तीची मालकी आलेली असेल अशाप्रकारे गिफ्ट डिड हे टायटल चे दुसरे डॉक्युमेंट आहे. Title Clear Property Documents

विल / मृत्युपत्र

तिसरे डॉक्युमेंट म्हणजे विल. म्हणजेच मृत्युपत्र एखाद्या व्यक्तीकडे जर मृत्युपत्राद्वारे संपत्ती आलेले असेल तर संपत्ती मालकी हक्क आला. अशाप्रकारे मृत्युपत्राद्वारे हा व्यक्ती त्या संपत्तीचा कायदेशीर टायटल होल्डर असतो.

वारस हक्क

चौथे डॉक्युमेंट म्हणजे वारस हक्क. वारस हक्क म्हणजे काय तर आपल्याकडे हिंदू सेक्शन ॲक्टनुसार एखादा घरचा करता पुरुष असेल. आपले आई-वडील, आजोबा पूर्वी जेव्हा भारतात तेव्हा त्यांची संपत्ती त्यांच्या वारसाला वारसा हक्क कायद्याने मिळते.

या संपत्तीसाठी तुम्हाला तुम्ही त्यांचे वारस आहात हे सिद्ध करावे लागते. यासाठी तुम्ही एखाद्या अधिकाराकडून प्रमाणपत्र घेऊ शकता. किंवा कोर्टामध्ये तुम्ही दाखा दावल करू शकता. कोर्टा मधून हेअरशिफ्ट सर्टिफिकेट घेऊन वारस म्हणून सर्टिफिकेट वर वारस नोंद करता येते.

व हे सर्टिफिकेट तुम्ही संबंधित मिळकतीवर नाव दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यास कोर्टातील वारस हक्क प्रमाणपत्र देऊ शकता. तेव्हा तुमचे नाव फेरफारद्वारे किंवा इतर प्रोसेस वापरून तुमचे नाव त्या संपत्तीवर लावले जाते.

हक्क सोड प्रमाणपत्र

या सर्वां व्यतिरिक्त पाचवे प्रमाणपत्र आहे ते म्हणजे हक्क सोड प्रमाणपत्र. समजा तुमच्याकडे एखादी प्रॉपर्टी आहे व वरील चार पैकी तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचे प्रमाणपत्र किंवा डॉक्युमेंट नाही.

तेव्हा हक्क सोड प्रमाणपत्र कामी येत खरंतर हे पत्र टायटल ट्रान्सफर होण्यापेक्षा टायटल मधील हक्क सोडते. हे एखाद्या प्रॉपर्टी वरील आपला हक्क सोडण्याचे डॉक्युमेंट असते त्यामुळे आपण वरील माहिती पाहताना त्याचा उल्लेख केलेला नाही.

दोन लोकांमध्ये मालकी हक्क असेल तर एक माणूस मालकी हक्क सोडतो. आणि हे कधी अप्लाय होते जर ती संपत्ती वारसा हक्क आणि वडीलोपार्जित आलेले असेल तरच हक्क सोड पत्राने सोडली जाते. तुमच्याकडे जर वीस- तीस वर्षांपासून प्रॉपर्टी किंवा पोझिशन असेल व त्यावर कोणाचाही क्लेम नसेल अशा पद्धतीची प्रॉपर्टी मध्ये तुम्ही या प्रॉपर्टीचा ताबा मालक या सूत्रात धरून मालक बनणार.

अशा प्रकारचे दस्त मध्ये तुम्ही मालक बनला असाल आणि कोर्टाचे एखाद्या प्रॉपर्टी चे डिस्ट्रिक्ट झालं आणि कोर्टाच्या आदेश तुमच्या बाजूने आला तर तुम्ही मालक बनता आणि हे डॉक्युमेंट तुमचे टायटल डॉक्युमेंट आहे ही सर्व टायटल ची डॉक्युमेंट्स आहेत.

अशाप्रकारे तुम्हाला कळाले असेल की टायटल चे डॉक्युमेंट्स कोणकोणते आहेत. Title Clear Property Documents

आता क्लिअर टायटल म्हणजे काय?

की तुमचे एखादे दस्त असेल आणि त्या दस्तावर कुठल्याही प्रकारचे ऑब्जेक्शन नसेल वाद नसेल तर ते टायटल क्लिअर आहे.

तुमचे टायटल होल्डर तुमच्याकडे एखाद्या प्रॉपर्टी चे टायटल चा दस्त आहे आणि टायटल क्लिअर आहे तर हा जास्त दुसऱ्याला विक्री करता येतो का? तर अजिबात येत नाही. क्लिअर टायटल असणे म्हणजे विक्रीसाठी तुमचा टायटल क्वालिफाय होतो असे अजिबात नाही.

विक्रीसाठी तुमच्या डॉक्युमेंट हे क्वालिफाय होण्यासाठी वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये बऱ्याच गोष्टी क्लिअर आहेत का ते पाहावे लागते. तसेच इतर अटी शर्ती लागू आहेत की नाही हे तपासावे लागते.

उदाहरणार्थ, पुण्यामध्ये एखाद्या व्यक्तीचे क्लिअर टायटल आहे एखादा प्लॉट आहे व तो क्लियर टायटल आहे. डॉक्युमेंट ही त्याच्याकडे आहेत. आणि तो कुठल्याही वादातही नाही. म्हणजे टायटल क्लिअर आहे.

तर मग ही प्रॉपर्टी ट्रान्सफर करता येईल का, तर जेव्हा तुम्ही एजंट कडे जातात तेव्हा त्या मालकाकडे जमिनीचे टायटल व डॉक्युमेंट क्लियर आहे असे सांगून सुद्धा तो जर म्हणत असेल की मी ही जमीन विकतो तर तुम्ही फसू नका टायटल क्लिअर आहे म्हणजे विकत घेण्यायोग्य आहे असे नसते. यासाठी तुम्ही हे चेक करा की तो प्लॉट R झोन मध्ये आहे का. R झोन डॉक्युमेंट क्लियर असेल तर ट्रान्सफर करण्यासाठी पहिली अट आहे की तो क्वालिफाय होतो.

दुसरं म्हणजे पुण्यामध्ये एखादी शेतजमीन असेल मात्र यासाठी 11 गुंठ्यांची अट असेल, तर बाकीची जिल्ह्यांमध्ये शेतजमिनी साठी अटी वेगवेगळ्या आहेत. तुम्ही संबंधित तलाठया कडे चौकशी केल्यास तुम्हाला असे कळेल की जिल्ह्यांमध्ये सेम अटी नसतात.

निर्धारित क्षेत्राच्या अटी या जिल्ह्यानुसार बदलतात. तर पुणे जिल्ह्यामध्ये 11 गुंठ्यांची जर शेत जमिनी असेल तर तुम्ही क्षेत्र विकत घेत असणार असाल तर क्वालिफाय होता. पण 11 पेक्षा कमी घेत असाल तर क्वालिफाय होत नाही. कारण टायटल क्लियर असणे पुरेसे नसते. पण आपल्याला इतर अटींमध्ये 11 गुंठ्यांची अट तुम्हाला अडकवून बसते.

हीच जमीन जर पुण्यामध्ये बायोडायव्हर्सिटी पार्क जवळ असेल तर, टायटल क्लियर असूनही तुम्ही प्लॉट घेऊ शकत नाही. मिळकत घेऊ शकत नाही. समजा तुमचं टायटल क्लियर आहे पण त्याच्यावर समजा रेस्ट्रिक्टेड झोनिंग पडली तर जिल्ह्यामध्ये पीएमआरडीए ने नव्याने डीपी प्लॅन केला आहे त्यानुसार अस समजा की झोनिंग तुमच्या प्रॉपर्टीवर पडले मुळे हस्तांतरण होऊ शकत नाही.

जर असे काही असेल तर तुम्ही ती संपत्ती घेऊ शकत नाही. म्हणून नुसते टायटलच नाही तर या व्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी असतात ज्या तुम्हाला माहिती नाहीत.

अशाप्रकारे या सर्व गोष्टी क्लिअर असतील स्पष्ट असतील कुठल्याही प्रकारचा कायदेशीर अडथळा नसेल, बांध नसेल तरच तुम्ही ती प्रॉपर्टी विकत घेऊ शकता किंवा देऊ शकता.

तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स द्वारे नक्की कळवा.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top