ग्रामपंचायत मासिक सभा ठराव | Grampanchayat Masik Sabha Tharav

Grampanchayat Masik Sabha Tharav एखाद्या ठरावावर एकमत न झाल्यास, अध्यक्ष यांनी सदर ठरावावर आवाजी, हात उंचावून किंवा गुप्त मतदान पद्धतीने मतदान घेऊन त्यानुरुप कार्यवाही करावी. एखाद्या ठरावास समसमान मते पडल्यास अध्यक्षांना निर्णायक मत देण्याचा अधिकार आहे.

जेव्हा एखादया मुद्यावर कायदेशीर विवाद होईल, त्या विषयावर ग्रामसेवकाने स्वतःचे कायदेशीर मत सभा वृत्तात नोंदविणे अभिप्रेत आहे.

सभेचे कामकाज संपल्यानंतर कार्यवृत्तांत लिहून अध्यक्ष यांचे सहीनिशी बंद करावा. सदरचा कार्यवृत्तांत ७ (सात) दिवसांचे आत पंचायत समितीला सादर केला पाहिजे. याची जबाबदारी ग्रामसेवक / सचिव यांची राहिल.

Grampanchayat Masik Sabha Tharav ठरावाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित अध्यक्ष, सचिव व ग्रामपंचायतची राहील. एखाद्या ठरावात बदल किंवा तो रद्द करावयाचा असल्यास, सदर ठराव तीन महिन्यानंतर सभेत चर्चा करून बहुमताने बदल किंवा रद्द करण्यात येईल.

ग्रामपंचायत कार्यालय कसे चालते? चला समजून घेऊया?

तीन महिन्यापर्यंत २/३ बहुमत तथा तीन महिन्यानंतर साध्या बहुमताने फेरबदल करता येईल. सभेची गणपुर्ती विहीत वेळेत न झाल्यास, अर्धा तास वाट पाहूनही गणपूर्ती झाली नाही, तर अशी सभा तहकूब करण्यात यावी. तसेच तहकूब झालेली सभा त्या दिवसानंतर इतर कोणत्याही दिवशी घेता येईल.

या सभेचा दिनांक, ठिकाण, वेळ निश्चित करून सभा सुचना नोटीस ग्रामपंचायतीच्या फलकावर लावावी तहकूब सुचनेची नोटीस प्रत्येक सदस्याला देण्याची तरतूद नाही.

सरपंच यांनी मासिक सभा महिन्यातून किमान एक घेणे बंधनकारक आहे (Grampanchayat Masik Sabha Tharav). तसेच सरपंच यांनी सभा बोलविण्यात कसूर केल्यास उपसरपंचानी ही सभा बोलवावी. सरपंच/उपसरंपच यांनी सभा घेण्यास किंवा बोलविण्यास असमर्थता दर्शविल्यास अशी बाब ग्रामसेवकांनी गट विकास अधिकारी यांच्या निदर्शनास आणून द्यावी.

ग्रामपंचायत कार्यालय कसे चालते? चला समजून घेऊया?

गट विकास अधिकारी यांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही ग्रामसेवकानी करावी, असे अभिप्रेत आहे. ग्रामपंचायतीची सभा बोलविण्यास किंवा घेण्यात सरपंच / उपसरपंच यांनी कसूर केल्यास सरपंच / उपसरपंच यांचेवर अपात्रतेची कारवाई कलम ३६ नुसार होऊ शकते.

सभा न घेण्यासाठीचे कारण पुरेसे होते की नाही, याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना आहेत. सभा न बोलविल्यास ग्रामसेवक / सचिव यांचेवर प्रशासकीय कारवाई होऊ शकते.

सदस्यांच्या मागणीवरुन एखादा विषय बहुमतानी मंजूर केला गेल्यास व तो ठराव गावाच्या व्यापक हितास बाधा निर्माण करणारा असेल तर सरपंच अशा ठरावाची अंमलबजावणी थांबविल. असा ठराव लगतच्या ग्रामसभेत ठेवण्याची व्यवस्था करील, त्यावर ग्रामसभेचा निर्णय अंतिम असेल.

मासिक सभा ठरावाची अंमलबजावणी करण्याकरिता संबंधित विभागाला ठराव सादर करण्याची जबाबदारी सरपंच व ग्रामसेवक यांची राहील. सलग ६ महिने सतत गैरहजर राहणाऱ्या सदस्यांना अध्यक्ष, जिल्हा परिषद हे अपात्र ठरवतील. तशी त्यांच्याकडे तक्रार आल्यास किंवा स्वत:हून अशा गैरहजर सदस्यांची नोंद घेऊन, त्याला बाजू मांडण्याची संधी देऊन न्याय्य निर्णय देतील.

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

ग्रामपंचायत किती विकास निधी आला आणि खर्च झाला माहिती मोबाईल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top