Galmukt Dharan & Galyukt Shivar Yojana गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना; शेतकऱ्यांना शेतात गाळ टाकण्यासाठी मिळणार ३७,५०० रूपये अनुदान….!!

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेसाठी अर्ज कुठे करावा?

निवड प्रक्रिया(यादी तयार करणे):

गाळ घेऊन गेलेले सीमांत/अत्यल्प भूधारक (एक हेक्टर पर्यंत) व लहान (एक ते दोन हेक्टर) शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात येईल. 

शिवाय विधवा, अपंग व आत्महत्याग्रस्त शेतकरी अनुदानास पात्र राहतील. सदर लोक बहुभुधारक असले तरी अनुदानास पात्र राहतील. 

शेतकऱ्यांना अनुदानाची मर्यादा: पसरविण्यात आलेल्या गाळाच्या रुपये ३५.७५ प्रति घनमीटर प्रमाणे एकरी रुपये १५००० च्या मर्यादित म्हणजेच एकरामध्ये ४०० घनमीटर गाळाच्या मर्यादित अनुदान देण्यात येईल. हे अनुदान फक्त अडीच एकर पर्यंत म्हणजेच रूपये ३७,५०० अधिकाधिक देय राहतील. विधवा, अपंग आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना ही मर्यादा लागू राहील. 

अर्ज कुठे करावा: गावात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अंतर्गत काम सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीचे ठराव घेऊन अशासकीय संस्थांनी जिल्हास्तरीय समिती प्रस्ताव सादर करावा. त्यात जलसाठ्यामध्ये अंदाजे उपलब्ध गाळाचा प्रमाणाचा उल्लेख असणे बंधनकारक राहील.

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेचे फायदे:

  • धरणातील जलसाठा वाढण्यास मदत होईल धरणातील जलसाठा वाढल्यामुळे याची मदत शेतकऱ्यांनाच होणार आहे शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात पिकांसाठी पाणी उपलब्ध होईल.
  • नापिक जमिनीमध्ये गाळ टाकल्यामुळे तिची सुपीकता वाढते आणि जमिनीचा पोत सुधारतो.
  • जमिनी चा पोत आणि सुपीकता वाढल्यामुळे शेतकऱ्यांना खतांवर येणारा खर्च कमी होईल.
  • जमिनीची सुपीकता वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात तसेच उत्पन्नात वाढ होईल. 

अधिकृत शासन निर्णय येथे पहा

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top