Income tax return इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) हा एक फॉर्म आहे जो व्यक्ती भारताच्या आयकर विभागाकडे जमा करतो आणि त्या वर्षातील त्याच्या उत्पन्नाची आणि देय करांची माहिती दाखल करतो.
ITR मध्ये दाखल केलेली माहिती 1 एप्रिल ते पुढील वर्षाच्या 31 मार्च दरम्यान विशिष्ट आर्थिक वर्षासाठी लागू असावी.
तुम्ही कमावलेले उत्पन्न पगार, व्यवसायातील नफा, घर किंवा मालमत्तेची विक्री, लाभांश किंवा भांडवली नफा आणि इतरांमध्ये मिळणारे व्याज यासारख्या स्रोतांमधून असू शकते. जर तुम्ही वर्षभरात जास्त कर भरला असेल तर तुम्हाला आयकर विभागाकडून परतावा मिळेल.
आयकर विभागाने कर भरण्याची प्रक्रिया अलीकडे सुलभ केलेले आहे. ही प्रक्रिया आपण घरबसल्याही करणे शक्य आहे. आयटीआयच्या अर्जामध्ये बरीचशी माहिती आधीच भरलेली असते.
जर आपण पहिल्यांदाच टॅक्स रिटर्न भरत असाल तर त्याबद्दल काही गोष्टींची माहिती करून घेणे जरुरीचे आहे. त्यासाठी कोणते अर्ज महत्त्वाचे असतात हे जाणून घेणे गरजेचे आहे.
त्यातल्या काही गोष्टी स्पष्ट नसल्यास किंवा आपल्याला जर कळाले नाहीत तर आपण त्या व्यक्तीच्या संबंधित व्यक्तींकडून सल्ला घ्यावा.
Income tax return टॅक्स रिटर्न भरताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे-
योग्य अर्ज निवड करा-
पहिल्यांदाच टॅक्स रिटर्न भरताना सर्वात पहिली पायरी म्हणजे योग्य अर्जाची निवड करणे. उपन्नानुसार अर्जाची निवड येत नसेल तर तज्ञांचा सल्ला घ्यावा.
जुनी किंवा नवी कर रचना ठरवा-
टॅक्स रिटर्न भरण्यासाठी एकच रचना होती. 2020 मध्ये कर रचना सुरू करण्यात आली.2023 मध्ये नवीन कर रचना सुरू करण्यात आली आहे.
फॉर्म 16 महत्त्वाचा-
ज्या कंपनीमध्ये कर्मचारी नोकरी करतो त्या कर्मचाऱ्याला कंपनी कडून हा फार्म दिला जातो, 15 जून पूर्वी हा फॉर्म जारी केला जातो.
या अर्जात तुमचे एकूण उत्पन्न, करप्राप्त उत्पन्न, तुमच्या वेतनातून कापून घेतलेला कर आदी माहिती या फॉर्ममध्ये नमूद असते.
फॉर्म 26 एस व एआयएस पीची काळजी-
कुठूनही वेतन मिळत नसलेल्या स्वयंरोजगार करणाऱ्या करदात्यांना रिटर्न फाईल करण्याआधी फॉर्म 26 एस आणि ॲन्युअल इन्फॉर्मेशन रिपोर्ट आयकर विभागाच्या पोर्टल वरून डाउनलोड करावा लागतो.
त्यात टीडीएस टीसीएस सह सर्व प्रकारच्या व्यवहाराची माहिती दिलेली असते.
Income tax return रिटर्न व्हेरिफाय करणे-
टॅक्स रिटर्न भरल्यानंतर व्हेरिफाय करणे सर्वात महत्त्वाचे आहे. आधार ओटीपी च्या आधारे हे अत्यंत सोप्या पद्धतीने ऑनलाईनही करता येते नेट बँकिंग सुविधाच्या माध्यमातूनही रिटर्न व्हेरिफाय करता येते.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
Thank you