Income Tax Return For Housewife गृहिणीसुद्धा भरू शकतात आयटीआर | हे आहेत फायदे |

Income Tax Return For Housewife

Income Tax Return For Housewife नोकरी किंवा व्यवसाय करणारी व्यक्ती ही इन्कम टॅक्स रिटर्न भरत असते. जर तुम्ही कोणतीही नोकरी करत नाही किंवा व्यवसाय करत नाही, तरी तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकतात. त्याचप्रमाणे गृहिणींना सुद्धा इन्कम टॅक्स रिटर्न भरणे फायदेशीर ठरू शकते.

गृहिणींना घर कामातून थोडा वेळ काढून इन्कम टॅक्स रिटर्न देता येतो. त्यातून गृहिणींना अनेक फायदे मिळतात. आपण बेरोजगार आणि गृहिणींना इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यानंतर कोणते फायदे मिळतात ते बघणार आहोत. लेख शेवटपर्यंत वाचा आणि आवडल्यास आपल्या मित्र-मैत्रिणींपर्यंत शेअर नक्की करा.

ही कागदपत्रे ठेवा जवळ

कोणतेही उत्पन्न नसताना भरल्या जाणाऱ्या इन्कम टॅक्स रिटर्नला नील रिटर्न किंवा शून्य रिटर्न म्हटले जाते. इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यानंतर गृहिणींना अनेक फायदे मिळतात.

कर्ज घेण्यासाठी उपयुक्त:

जर एखाद्या व्यक्तीला कर्ज घ्यायचे असेल तर अशा वेळेस बँक ही नियमित उत्पन्न किती आहे आणि आयटीआर किती आहे हे बघतात. यामुळे जर गृहिणींना एखादा व्यवसाय करण्यासाठी कर्ज घ्यायचे असेल तर त्यांना आयटीआर चा फायदा होतो.

हे वाचले का?  Bank Account Zero Balance बँक खात्यात झिरो बॅलन्स असेल, तरीही पेमेंट करता येणार..?

ही कागदपत्रे ठेवा जवळ

व्हिसा साठी उपयुक्त:

नील आयटीआर मुळे व्हिसा मिळणे सोपे होते. अनेक देशांच्या व्हिसा साठी दहा वर्षांपर्यंतचा आयटीआर भरणे आवश्यक आहे. जी व्यक्ती आयटीआर भरते ती व्यक्ती कायदे पालन करणारी आहे हे आयटीआर मधून सिद्ध होते. तसेच अर्जदार हा त्याच्या मायदेशी परतण्यास सधन आहे हे पण सिद्ध होते.

टीडीएस परतावा सुलभ होतो:

काही गृहिणींच्या नावाने मुदत ठेवी म्हणजेच एफडी असतात. ज्यावेळी एफडी परिपक्व होते. त्यावेळेस त्यावर टीडीएस कापला जातो. ज्यावेळेस करदाता हा 15 जी किंवा एच फॉर्म भरायला विसरला असेल, तर अशा वेळेस टीडीएस हा कापला जातो. अशावेळी कर परतावा मिळण्यासाठी आयटीआर असणे आवश्यक आहे.

ही कागदपत्रे ठेवा जवळ

हे वाचले का?  Ration Card Online Maharashtra रेशन कार्ड मोठी अपडेट | नवीन कार्ड काढणे, जुने रेशन कार्ड दुरुस्ती ची सर्व कामे घरबसल्या होणार |

Income Tax Return For Housewife शून्य रिटर्न केव्हा दाखल करावे?

ज्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्या व्यक्तींना कोणताही कर भरावा लागत नाही. परंतु असे लोक सुद्धा आयटीआर भरू शकतात. भरला जाणारा कर हा शून्य असतो, म्हणून त्यास नील किंवा शून्य रिटर्न म्हणतात.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

हे वाचले का?  Cibil Score अशी घ्या काळजी सिबिल स्कोअरची.........!!!!!!

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top