Mahila Swayamsiddha Vyaj Partava Yojana महिला स्वयंसिद्धी कर्ज योजना | बघा संपूर्ण माहिती |

अर्जदाराच्या पात्रतेच्या अटी व शर्ती :-

१. महिला बचत गटातील महिला इतर मागास प्रवर्गातील व महाराष्ट्राची रहिवासी असावी…

२. पात्र महिलांचे किमान वय १८ आणि कमाल वय ६० वर्षे राहील.

अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे / पुरावे –

१. अर्जदारास सक्षम अधिकाऱ्याने निर्गमित केलेला इतर मागास प्रवर्गातील जातीचा दाखला (OBC)

२. वयाचा पुरावा उदा. जन्म तारखेचा पुरावा / शाळा सोडल्याचा दाखला. ३. रहिवासी दाखला (आधार कार्ड, ३ महिन्यातील लाईट बिल, फोन बिल झेरॉक्स,

प्रॉपर्टी कार्ड, व्होटर कार्ड, पासपोर्ट ) ४. बचत गटाचे बँक पासबुक झेरॉक्स.

५. बचत गटातील महिला सदस्यांचे CMRC कडून प्रमाणित कौटुंबिक उत्पन्नाबाबतचे प्रमाणपत्र अथवा स्वयं घोषणापत्र,

कार्यपद्धती-

१. महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजना ही ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येईल.. २. CMRC मार्फत प्राप्त झालेल्या प्रस्तावावर विहित पध्दतीने तपासणी करुन सदर प्रस्ताव ओबीसी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयामार्फत ओबीसी महामंडळाच्या मुख्यालयाकडे पात्रता प्रमाणपत्र (Letter of intent) निर्गमित करण्याच्या कार्यवाहीकरीता सादर करण्यात येईल.

३. ओबीसी महामंडळाच्या मुख्यालया मार्फत संबंधीत प्रस्तावात LOI पात्रता प्रमाणपत्र निर्गमित करुन त्याची प्रत CMRC ला पुढील कार्यवाहीसाठी अग्रेषित करण्यात येईल. ४. ओबीसी महामंडळाकडुन निर्गमित केलेल्या पात्रता प्रमाणपत्राची (Letter of Intent) वैधता १ वर्ष राहील.

५. LOI द्वारे बँकेने मंजुर केलेल्या आणि नियमित कर्ज परतफेड केलेल्या बचत गटास त्यांच्या भरणा केलेल्या १२% पर्यंतच्या व्याज मर्यादेत व्याज रक्कमेच्या परताव्याची मागणी बँकेच्या प्रमाणिकरणानुसार महामंडळाच्या पोर्टलवर करण्यात यावी.

६. CMRC च्या प्रमाणिकरणानंतर व्याज परताव्याची रक्कम बचत गटाच्या बँक खात्यामध्ये महामंडळामार्फत त्रैमासिक पध्‍दतीने वर्ग करण्यात येईल.

७. बचत गटास बँकेने मंजुर केलेल्या व्यवसायाचे फोटो वर्षातून किमान एक वेळा तसेच, कर्ज परतफेडीच्या एकूण कालावधीमध्ये किमान तीन वेळा व्याज परतावा मागणी करतांना वेब पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक राहील.

महिला स्वयंसिद्धी कर्ज योजना शासन निर्णय येथे पहा

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top