Online Shopping Tips कोणताही सण म्हटला की ऑनलाइन शॉपिंग उपलब्ध असलेल्या अॅप्स वर बंपर ऑफर दिल्या जातात. ऑनलाइन खरेदीला विरोध जरी असला तरी ऑनलाइन खरेदी टाळली जाऊ शकत नाही. आजकालच्या इंटरनेट च्या युगात ऑनलाइन खरेदीला पर्याय नाही. ज्या वस्तुंसाठी स्थानिक बाजारात जास्त किंमत द्यावी लागते किंवा ज्या वस्तु मिळत नाही अशा मिळवण्यासाठी ऑनलाइन शॉपिंग चा योग्य पर्याय आहे.
परंतु ऑनलाइन शॉपिंग करताना काळजी घेणे गरजेचे आहे. जर काळजी नाही घेतली तर खरेदी करणारी व्यक्ति अडचणीत येऊ शकते. शॉपिंग च्या नावाने इंटरनेटवर अनेक फसव्या वेबसाइट आहेत.
जर तुम्हाला फसायचे नसेल वेबसाइट च्या अॅड्रेस बार च्या डावीकडे क्लिक करा. तिथे तुम्हाला साइटप्रमाणपत्राची माहिती मिळेल. जर ती अधिकृत वेबसाइट नसेल तर त्या वेबसाइट वर शॉपिंग करू नका.
Online Shopping Tips सुरक्षेसाठी काय कराल:
- तुमच्या ऑनलाइन खात्यांसाठी मजबूत पासवर्ड वापरा.
- ऑनलाइन शॉपिंग करण्यासाठी शक्यतोवर क्रेडिट कार्ड चा वापर करा.
- सार्वजनिक वायफाय चा वापर करू नका.
- तुमचे डिव्हाईस सॉफ्टवेअर आणि व्हाअरस संरक्षण अपडेट करत राहावे.
ग्राहकाचे अधिकार व रिटर्न पॉलिसी:
एखादी वस्तु खरेदी करण्यापूर्वी ग्राहकाने आपले अधिकार जा घेणे गरजेचे आहे. जर तुम्ही खरेदी केलेली वस्तु खराब निघाली तर वेळेत परत न केल्यास ती वस्तु परत करण्याचा हक्क गमावून बसू शकते. याखेरीज आर्थिक ट्रान्झॅक्शन ची माहिती घेणे आवश्यक आहे.
स्वस्त खरेदी करण्यासाठी हे करा:
- वेबसाइट ची मेंबरशिप घ्या.
- विशेष ऑफर च्या काळात खरेदी करा.
- वस्तूंच्या किमतीची तुलना करावी.
- डिस्काउंट कूपन वापरावे
- शिपिंग चार्जेस वाचवण्यासाठी एक वेळी अनेक वस्तूंची खरेदी करावी.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.