Postal Life Insurance पोस्टल लाइफ इन्शुरन्स!!!

इतर फायदे :

या योजनेमध्ये विमाधारकाला करात सूट मिळते. पोस्टल लाइफ इन्शुरन्स मध्ये भरलेल्या प्रीमियम साठी तुम्हाला आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत सूट मिळू शकते या योजनेमार्फत तुम्हाला प्रीमियम भरण्यासाठी विविध सुविधा दिलेल्या आहेत. म्हणजेच मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक असा पर्यायही दिला जातो. तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल त्यानुसार तुम्ही पर्याय निवडू शकता. एवढेच नाही तर तुमची इच्छा असल्यास तुम्ही ही पॉलिसी 59 वर्षांच्या वयापर्यंत एंडोमेंट अ‍ॅश्युरन्स पॉलिसीमध्ये रूपांतरित करू शकता.

योजनेचा फायदा कोण कोण घेऊ शकते ?

2017 पूर्वी केवळ सरकारी आणि निमशासकीय कर्मचारी या योजनेचा लाभ घेऊ शकत होते, मात्र 2017 नंतर डॉक्टर, अभियंते, वकील, व्यवस्थापन सल्लागार, चार्टर्ड अकाउंटंट, आर्किटेक्ट, बँकर्स आणि कर्मचारी इत्यादी सर्व विमा योजनेचा लाभ घेऊ शकतात. 

जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन देखील ही योजना खरेदी करू शकता.

अधिक माहितीसाठी https://www.indiapost.gov.in/Financial/Pages/Content/pli.aspx या लिंकवर क्लिक करा.

अशाच नवनवीन माहिती साठि आमच्या पेज ला भेट देत रहा.

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top