Private Hospital Corona Patients Bill | खाजगी हॉस्पिटल्स मधील कोरोना रूग्णावरील उपचार खर्च परत मिळणार |

Corona Patients Bill Reverse
Private Hospital Corona Patients Bill reverse

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलीग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube 

Mahatma Phule Jan Arogya Yojana कोविड उपचाराची बिले मिळणार परत मिळणार, (Mahatma Phule Jan Arogya Yojana) योजनेतून Private Hospital Corona Patients ने उपचार घेतल्यानंतर ज्या खासगी रुग्णालयांनी बिले आकारली.

ती परत मिळण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे त्या विषयाचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महाराष्ट्र शासनाला दिले आहे.

या याचिकेवर निर्णय देताना माननीय उच्च न्यायालय यांनी महाराष्ट्र शासनाला तसे आदेश आता दिले आहेत की Private Hospital/ हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले अशा रुग्ण जर Mahatma Phule Jan Arogya Yojana यांचे जर लाभार्थी पात्र असतील तर त्याना आकारण्यात आलेली बिलाची रक्कम परत देण्यात यावी.

राज्य सरकारने या याचिकेवर ती म्हणणे मांडत असताना काही आकडेवारी न्यायालयात सादर केली होती.

हे वाचले का?  Birsa Munda Krushi Kranti Yojana बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना संपूर्ण माहिती |

त्यानुसार पाच हजार पेक्षा जास्त नागरिकांना या योजनेतून कोरोना रुग्णांवरील बिले परत करण्यात आली आहे.

कोरोना रूग्णावरील व्हेंटिलेटर वरील आठ उपचार व इतर आवश्यक 20 उपचार यांचा समावेश Mahatma Phule Jan Arogya Yojana मध्ये समाविष्ट करण्यात आले होते.

याविषयी शासन निर्णय ही प्रसिद्ध करण्यात आला होता त्याची माहिती न्यायालयात दिली. पण या शासन निर्णयाची अंमलबजावणी काही हॉस्पिटल करण्यास टाळाटाळ केली किंवा हलगर्जीपणा करून पात्र कोरोना रुग्णांना याचा लाभ दिला नाही.

हे ही वाचा

PF खातेदारांना आनंदाची बातमी 7 लाखांचा विमा मिळणार मोफत, भविष्य निर्वाह निधी संघटनेचा निर्णय

यावर उदाहरणादाखल याचिकाकर्ते ओमप्रकाश शेटे यांनी न्यायालयात २० ते २५ पुरावे सादर केले ज्या रुग्णांना हॉस्पिटल यांनी Mahatma Phule Jan Arogya Yojana योजनेत पात्र असतानाही त्यांना या योजनेतून लाभ दिला नाही व भरमसाठ बिले आकारली

हे वाचले का?  पुतळा उभारणी साठी नियम, अटी परवानगी

यावर उत्तर देताना सरकारी पक्षाच्या वतीने बाजू मांडण्यात आले की अशा हॉस्पिटल आता नोटीस देण्यात आली असून, टाळाटाळ करणाऱ्या हॉस्पिटल वरती आता कारवाई करण्यात येणार आहे.

न्यायालयाने ही बाब अतिशय गंभीर समजून सरकारला आता आदेश दिले आहेत की अशाच Private Hospital Corona Patients Bill रुग्णांची बिले नातेवाईकांना परत देण्याकरता व्यवस्था उभारण्यात यावी व पीडितांना त्यांचे पैसे परत मिळावे.

Private Hospital Corona Patients Bill उपचाराचा खर्च परत मिळवण्यासाठी-
कोरोना रुग्णांवरील उपचाराचा खर्च परत मिळवण्यासाठी आता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीकडे अर्ज करावयाचा आहे व अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावी लागतील.

१. या रुग्णालयात उपचार घेतला येथील सर्व बिले.
२. मेडिकल औषधे यांच्या पावत्या बिले.
३. रुग्णाचे आधार कार्ड
४. रुग्णांचे रेशन कार्ड पिवळे किंवा केशरी
५. विहित नमुन्यातील अर्ज.

हे वाचले का?  जीवन प्रमाण योजना पेन्शनधारकांसाठी डिजिटल हयातीचा दाखला

महात्मा ज्योतिबा फुले योजना परतावा अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांचा कोरणा रुग्ण बिल परत मिळवण्यासाठी चा निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलीग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube 

व्हिडिओ पाहण्यासाठी

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top