कोणकोणत्या प्रकारे तक्रार करू शकता ?
मित्रांनो कर्मचाऱ्यांना नोकरीशी संबंधित तक्रार दाखल करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. समाधान पोर्टलच्या वेबसाईटवर भेट देऊन कर्मचारी त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतात. तसेच ‘उमंग‘ मोबाईल ॲपच्या माध्यमातूनही कर्मचारी तक्रार नोंदवू शकतात. जर एखादी व्यक्ती स्वतः तक्रार नोंदवू शकत नसेल तर, ती जवळच्या सी एस सी केंद्रावर म्हणजेच ‘कॉमन सर्विस सेंटर’ ला भेट देऊन कंपनीविरुद्ध तक्रार दाखल करू शकते.
कर्मचाऱ्यांनी नोंदवलेल्या तक्रारीवर भारत सरकार थेट कारवाई करते.
तर मित्रांनो ही पोस्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट्स द्वारे कळवा