Sarathi ‘सारथी’ कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

Sarathi

Sarathi ‘सारथी’मार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘संघ लोकसेवा आयोग परीक्षा मोफत प्रशिक्षण’ योजनेची माहिती आजच्या लेखात आपण घेणार आहोत.

मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा समाजातील उमेदवारांना केंद्रीय नागरी सेवेतील प्रशासकीय पदावर काम करण्याची संधी मिळावी, यासाठी ‘सारथी’संस्थेमार्फत संघ लोकसेवा आयोग अर्थात ‘युपीएससी’मार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेचे निशुल्क प्रशिक्षण देण्यात येते.

हे प्रशिक्षण देण्यासाठी ‘सारथी’ने पुणे येथील तीन प्रशिक्षण संस्था आणि दिल्ली येथील दोन संस्थांची निवड केली आहे. दरवर्षी युपीएससी नागरी सेवा स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी चाळणी परीक्षा आणि कागदपत्रे पडताळणीद्वारे एकूण 500 उमेदवारांची निवड करण्यात येते.

या उमेदवारांना पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तीन टप्प्यासाठी प्रशिक्षणाचे देण्यात येते.

निवड झालेल्या उमेदवारांना ‘सारथी(Sarathi II)’ने निवडलेल्या पाचपैकी कोणत्याही एका संस्थेत प्रवेश घेण्याचा पर्याय उपलब्ध असतो.

प्रशिक्षणार्थींना ‘सारथी’मार्फत असे मिळते सहाय्य

उमेदवारांना निशुल्क प्रशिक्षणासोबत दिल्ली येथे प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना तेथील वास्तव्यासाठी दरमहा 13 हजार रुपये आणि पुणे येथे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तेथील वास्तव्यासाठी 9 हजार रुपये दरमहा दिले जातात.

हे वाचले का?  Adiwasi Vikas Yojana आदिवासी समाजाच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजना

तसेच या उमेदवारांचा प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश निश्चित झाल्यानंतर पुस्तके, स्टेशनरी आदी बाबींसाठी एकत्रित 18 हजार रुपये रक्कम आकस्मिक खर्च म्हणून दिली जाते.

पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी एकरकमी 50 हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते.

तसेच मुख्य परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना मुलाखतीच्या तयारीसाठी एकरकमी 25 हजार रुपये अर्थसाहाय्य मंजूर करण्यात येते.

Sarathi योजनेचा लाभ घेण्यासाठी या आहेत प्रमुख अटी

उमेदवार हा महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या प्रवर्गातील 21 ते 32 वर्षे वयोगटातील असावा.

याबाबत सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेला जातीचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला त्याच्याकडे असणे आवश्यक आहे.

कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा अधिक नसावे.

उमेदवाराच्या नावाचे तहसीलदार अथवा सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले शैक्षणिक वर्षाच्या लगतपूर्वीच्या वित्तीय वर्षीचे उत्पन्न प्रमाणपत्र व नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र किंवा ईडब्लूएस प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

हे वाचले का?  "तौक्ते" चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदत जाहीर

अर्ज भरण्याच्या दिवशी उमेदवाराकडे कोणत्याही शाखेची पदवी असावी.  

उमेदवाराने इतर कोणत्याही शासकीय, निमशासकीय, खाजगी संस्थाकडून या प्रशिक्षणाचा लाभ घेतलेला नसावा.

अशी आहे उमेदवारांची निवड प्रकिया

‘सारथी’च्या https://sarthi-maharashtragov.in/ या संकेतस्थळावर आणि वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करून उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविले जातात.

अर्जदाराची निवड ‘सारथी’मार्फत आयोजित ‘सीईटी’मध्ये प्राप्त गुणांद्वारे केली जाते.

या गुणांकानुसार गुणवत्ता यादी ‘सारथी’च्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येते.

त्यानंतर कागदपत्रे पडताळणीद्वारे पात्र विद्यार्थ्यांची प्रवेश प्रकिया पूर्ण केली जाते.

 ‘सारथी’च्या प्रशिक्षणातून घडले 12 आयएएस, 18 आयपीएस…

‘सारथी’मार्फत संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेचे प्रशिक्षण घेवून 2020 ते 2022 या गत तीन वर्षात 12 उमेदवार भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) आणि 18 उमेदवार भारतीय पोलीस सेवेमध्ये (आयपीएस) दाखल झाले आहेत. तसेच 8 जणांची भारतीय राजस्व (आयआरएस) सेवेत, एका उमेदवाराची भारतीय वन सेवेत (आयएफएस) तर 12 जणांची इतर केंद्रीय सेवांमध्ये निवड झाली आहे.

हे वाचले का?  Namo Shetkari 6th Installment शेतकऱ्यांसाठी खुशखबर, नमो शेतकरी योजनेचा 6 वा हफ्ता आणि थकीत हप्ते देखील मिळणार

सन 2023-24 मधील प्रशिक्षणासाठी 31 डिसेंबर 2023 पर्यंत करता येईल अर्ज

सन 2023-24 मध्ये ‘सारथी’च्या संघ लोकसेवा आयोग परीक्षा मोफत प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

https://sarthi-maharashtragov.in/ या संकेतस्थळावर 31 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.

या संकेतस्थळावर योजनेच्या अटी, शर्ती आणि पात्रता निकषांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top