Samaj Kalyan Yojana मागासवर्गीय व दिव्यांगांना स्वीय निधीचा आधार

Samaj Kalyan Yojana

Samaj Kalyan Yojana जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून स्वीय निधीमधून विविध योजना राबविण्यात येतात.

यामध्ये मागासवर्गीयांकरिता राखीव 20 टक्के स्वीय निधीतून घरकुल योजना, दिव्यांगासाठी राखीव 5% निधीतून दिव्यांग घरकुल योजना, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दिव्यांग कल्याण  निधीतून स्वयंचलित तीन चाकी सायकल  योजना राबविण्यात येतात.

या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी पंचायत समितीकडे अर्ज करणे आवश्यक आहे. जाणून घेऊया या योजनांविषयी …..

जिल्हा परिषद सांगलीकडून स्वीय निधीमधून सन 2023-24  मध्ये राबविण्यात येणाऱ्या योजना पुढीलप्रमाणे… 

(१) Samaj Kalyan Yojana मागासवर्गीय व्यक्तींना घरकुल योजना –2023-24 –

ग्रामीण भागातील  मागासवर्गीय व्यक्तींना (पुरूष  व महिला )  (अ.जा., अ.ज., वि.जा.भ.ज. व नवबौध्द) घरबांधणीसाठी आर्थिक सहाय्य करणे हा या योजनेचा उद्देश आहे. 

लाभार्थी पात्रता निकष:

  • अर्जदार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, नवबौध्द या प्रवर्गातील असावा/असावी.
  • अर्जदाराच्या कुटुंबाचे मागील आर्थिक वर्षाचे एकूण उत्पन्न एक लाख रूपये च्या आत असावे (कुटुंब : एकाच शिधापत्रिकेवरील नमूद लोकांचा गट).
  • अर्जदार महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहिवासी असावी.
  • अर्जदाराने या किंवा शासनाकडील अन्य घरकुल योजनेचा यापूर्वी लाभ घेतलेला नसावा.
  • अर्जदाराच्या कुटुंबातील कुणीही व्यक्ती शासकीय व निमशासकीय नोकरीत नसावी.
  • एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल.
  • अर्जदाराच्या स्वत:च्या नावे असणाऱ्या जागेचा 8अ उतारा असेसमेंट लिस्ट नुसार किमान क्षेत्रफळ 269 चौ. फूट असावे.
  • गावात अर्जदाराचे किंवा त्याच्या कुटुंबियांच्या नावे कोणतेही पक्के घर नसावे.
  • अर्जदाराने पंचायत समिती स्तरावर विहीत नमुन्यात अर्ज करणे आवश्यक राहील.
  • पंचायत समिती स्तरावरून प्राप्त झालेल्या पात्र अर्जदारांच्या यादीमधून लाभार्थी निवड सोडत (लकी ड्रॉ) पध्दतीने करण्यात येईल.
  • प्रति लाभार्थी 1 लाख 20 हजार रूपये रक्कम देय आहे.
हे वाचले का?  सावकारी कायदा Savkari Kayada 2014

स्वयंचलित तीन चाकी सायकल  योजना 2023-24

(२)  दिव्यांग घरकुल योजना 2023-24 :

ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तींना घर बांधणीसाठी आर्थिक सहाय्य करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

लाभार्थी पात्रता निकष

  • अर्जदाराचे  दिव्यांगत्वाचे प्रमाण किमान 40 टक्के असावे.
  • अर्जदाराच्या  कुटुंबाचे मागील आर्थिक वर्षाचे एकूण उत्पन्न 1 लाख रूपये च्या आत असावे. (कुटुंब :एकाच शिधापत्रिकेवरील नमूद लोकांचा गट ).
  • अर्जदार महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहिवासी असावी.
  • अर्जदाराने  या किंवा शासनाकडील अन्य घरकुल योजनेचा यापूर्वी लाभ घेतलेला नसावा. अर्जदाराच्या कुटुंबातील कुणीही व्यक्ती शासकीय व निमशासकीय नोकरीत नसावी.
  • एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला सदर योजनेचा लाभ घेता येईल.
  • अर्जराच्या नावे असणाऱ्या जागेचा 8 अ उतारा असेसमेंट लिस्ट नुसार- किमान क्षेत्रफळ 269 चौ.फूट असावे.
  • पालकांच्या नावे जागा असेल तर संबंधितांचे संमतीपत्र आवश्यक.
हे वाचले का?  Mukhyamantri Tirth Darshan Yojana Maharashtra ज्येष्ठ नागरिकांना मोफत यात्रा | मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू | शासन निर्णय जाहीर |

स्वयंचलित तीन चाकी सायकल  योजना 2023-24

  • गावात अर्जदाराचे किंवा त्याच्या कुटुंबियांच्या नावे कोणतेही पक्के घर नसावे.
  • अर्जदाराने पंचायत समिती स्तरावर विहीत नमुन्यात अर्ज करणे आवश्यक राहील.
  • पंचायत सिमती स्तरावरून प्राप्त झालेल्या पात्र अर्जदारांच्या यादीमधून लाभार्थी निवड सोडत (लकी ड्रॉ) पद्धतीने करण्यात येईल.
  • प्रति लाभार्थी 1 लाख 20 हजार रूपये रक्कम देय आहे.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top