1. मंडल निरीक्षक सर्कल (Circle) हा, आपल्या मंडलातील तलाठ्यांना त्यांच्या सर्व कर्तव्याचे प्रशिक्षण देण्यात जबाबदार राहील. तलाठी सर्वनियमांचे व आदेशाचे पालन करीत असल्याबद्दल मंडल निरीक्षकाने खात्री करून घ्यावी व एखादे गंभीर उल्लंघन असल्यास त्यासंबंधी प्रतिवेदन करावे.सर्व तलाठी आपापल्या मुख्यालय कायम वास्तव्य करीत असल्याचे पाहण्यास मंडल निरीक्षक जबाबदार राहील. एखादा तलाठी तसा राहत नसल्यास, मंडल निरीक्षकाने त्या बाबतीतील आवश्यक त्या कार्यवाहासाठी तहसीलदाराला कळवावे. 4. जे तलाठी आपल्या कर्तव्यपालनात निष्काळजी किंवा दीर्घसूत्री आहेत किंवा जे अनारोग्य, वृद्धावस्था किंवा इतर कारणांमुळे आपल्या कर्तव्याचे योग्य रीतील पालन करण्यास अयोग्य आहेत असे मंडल निरीक्षकाला वाटते अशा तलाठ्यांची नावे त्याने कळवावीत. 5.तालुका अभिलेख कक्षामध्ये अभिलिखित करण्यासाठी अग्रेषित करणे आवश्यक असलेले आपले सर्व अभिलेख तलाठ्याने अग्रेषित केले असल्याचे पाहण्याच्या दृष्टीने मंडल निरीक्षकाने तलाठ्याच्या दफतराची तपासणी करावी. 6. मंडल निरीक्षकाच्या प्रत्येक भेटीची किंवा तपासणीची नोंद, तलाठ्याच्या दैनंदिनीत व भेट,नोंद पुस्तकात त्याचप्रमाणे, त्याच्या स्वत:च्या दैनंदिनीतही घेण्यात यावी. 7. मंडल निरीक्षकाला, तपासणी व पर्यवेक्षण या विषयी त्याच्या मंडलातील तलाठ्याच्या बाबतीत पूर्ण शक्ती असतील. 8. सर्वसाधारणपण, मंडल निरीक्षकाने वर्षभरात आपल्या मंडलातील प्रत्येक गावाची संपूर्ण तपासणी करावी ; परंतु, मंडलाच्या आकारामुळे किंवा इतर कारणांमुळे, संपूर्ण वार्षिक तपासणी करणे शक्य नसेल तर, प्रत्येक वर्षी मंडल निरीक्षक आपल्या मंडलातील गावांची तपासणी पुरेशा संख्येने करीत असल्याचे तसेच दोन वर्षाच्या कालावधीत प्रत्येक गावाची तपासणी पूर्ण करीत असल्याचे पाहण्यास तहसिलदार जबाबदार आहे. 9. मंडल निरीक्षकाने, तलाठ्याने ठेवलेल्या सर्व गाव नमुन्यांची तपासणी करावी व तलाठी अचूक मागणी करतो, जमीन महसूल देण्यास जबाबदार असणाऱ्या व्यक्तींकडून ती वसूल करतो, वसुलीचे हिशेब योग्य रीतीने व अचूक ठेवतो व सामान्य प्रशासनाला आवश्यक असलेली माहिती अचूकपणे गोळा करतो याची खात्री करून घ्यावी. 10. जमीन महसूल व जमीन महसूल म्हणून वसुलीयोग्य असलेल्या इतर रकमा गोळा करण्यावर मंडल निरीक्षकाने लक्ष ठेवावे व अनधिकृत थकबाकी शिल्लक राहात नसल्याची खात्री करून घेण्याच्या दृष्टीने अशा रकमा गोळा करण्याच्या कामी तलाठ्याला सहाय्य करावे व वसुलीच्या रकमांचा भरणा कोषागारता योग्य रीतीने केला जात असल्याबद्दल खात्री करून घ्यावी. यासाठी, त्याने तोंडी तपासणी करून व खातेवहीशी ताडून पाहून पुरेशा पावत्यांची चाचणी दाखल तपासणी करावी ; त्याचप्रमाणे पावती आणि रोख पुस्तक यावरून चलान तपासून वसूल करण्यात आलेल्या सर्व रकमा योग्य रीतीने कोषागारता जमा करण्यात आल्याची खात्री करून घ्यावी. त्याने, तलाठ्याजवळ काही रक्कम असल्यास ती सत्वर कोषागारता जमा करायला लावावी. तसेच, आकारण्याचे पुनरीक्षण करण्यासाठी व भाडेपट्टयाचे नवीनीकरण करण्यासाठी वेळीच कार्यवाही केली जात असल्याचेही त्याने पहावे. 11. नव-नवीन माहिती 12. मंडल निरीक्षकाने, जमिनीच्या सर्व तुकड्यांची फेरफारांच्या नोंदवहीत योग्यरीतीने नोंद घेण्यात आली असल्याची तसेच संबंधीत व्यक्तींना विहित नमुन्यातील नोटीसा देण्यात आल्या असल्याची खात्री करून घ्यावी. 13. संबंधित कुळवहिवाट कायदा व मुंबई विखंडन प्रतिबंध व धारण जमिनींचे एकत्रीकरण अधिनियम यांमधील उपबंधाचे उल्लंघन करून,केलेल्या व्यवहारांची फेरफारांच्या नोंदवहीत योग्यरीतीने नोंद घेऊन आवश्यक त्या पुढील कार्यवाहीसाठी आवश्यक ती प्रतिवृत्ते तहसिलदाराला सादर करण्यात येत असल्याची मंडल निरीक्षकाने खात्री करून घ्यावी. 14. मंडल निरीक्षक गावात आल्याबरोबर भेगवटया खालील व बिनभोगवट्या खालील भूमापन क्रमांक पद्धतशीरपणे तपासणीसाठी निवडली, त्यामुळे प्रत्येक वर्षी पिकांच्या विविध जाती व पाच वर्षामध्ये आळी पाळीने प्रत्येक क्षेत्र तपासणीखाली येईल.