पीक कर्ज च्या वसुलीस ३१ जुलै २०२१ पर्यंत मुदतवाढ

पिक कर्ज
इइमीमिमीपिक कर्ज

राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, व्यापारी बँकांनी शेतकऱ्यांना सन 2020-21 या वर्षात दिलेल्या पीक कर्ज च्या वसुलीस 31 जुलै 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

सहकार मंत्री श्री.पाटील म्हणाले, राज्यात एप्रिल व मे 2021 मध्ये उद्भवलेल्या कोव्हिड-19 च्या परिस्थितीमुळे लागू केलेल्या टाळेबंदीच्या कालावधीत शेतकऱ्यांनाही शेतमालाच्या विक्री व्यवस्थेतील अडचणी आणि साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना अद्याप देय असलेली एफआरपी विचारात घेता शेतकऱ्यांच्या हितासाठी पीक कर्ज मुदतवाढ देण्यात आली असल्याचे बाळासाहेब.पाटील यांनी सांगितले.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, व्यापारी बँकांमार्फत शेतकऱ्यांना पीक कर्ज पुरवठा करण्यात येतो. जे शेतकरी बँकाकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड 30 जूनपर्यंत करतात. अशा शेतकऱ्यांना पीक कर्जाची विहित मुदतीत ओझें परतफेड करण्यासाठी व्याजामध्ये प्रोत्साहनपर सवलत देण्यासाठी डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राबविण्यात येते.

हे वाचले का?  Ration Card latest update धक्कादायक महाराष्ट्रातील 1.27 लाख रेशन कार्ड रद्द होणार.

नवनवीन माहिती

या वाढीव मुदतीत पीक कर्जाची परतफेड करणारे शेतकरी हे डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ मिळण्यास पात्र असतील. याबाबतचा शासननिर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

हे ही वाचा

हे वाचले का?  Tukade Bandi Kayda तुकडेबंदी कायदा मधील महत्त्वाच्या तरतुदी

सन 2020-21 या वर्षात दिलेल्या पीक कर्जाच्या परतफेडीस मुदतवाढ देण्याबाबत GR डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहन्यायासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top