Talathi शेतकऱ्यांचे तलाठी कार्यालयातील हेलपाटे होणार बंद, ही 11 काम ऑनलाइन करता येणार घरबसल्या

Talathi

Talathi शेतकऱ्यांना शेती आणि जमिनी संबंधित अनेक कामांसाठी तलाठी कार्यालयांमध्ये जावे लागते. कामासाठी तलाठी कार्यालय मध्ये जाऊन सुद्धा काम हे वेळेवर होत नाही अशा अनेक तक्रारी लोक करतात. परंतु आता 11 काम ही तलाठी(Talathi) कार्यालयामध्ये न जाता घरबसल्या ऑनलाइन करता येणार आहेत.

ई हक्क प्रणाली च्या माध्यमातून फेरफार नोंदणी साठी अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे. बोजा चढविणे किंवा गहाणखत तयार करणे, वारस नोंद, मृत व्यक्तीचे नाव कमी करणे, अशी अनेक कामे आता ऑनलाईन करता येणार आहेत.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ई हक्क प्रणालीच्या माध्यमातून नागरिकांना 11 प्रकारच्या फेरफार नोंदीचे अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. परंतु ग्रामीण भागात अनेक नागरिकांना ऑनलाईन अर्ज शक्य होत नाही किंवा ऑनलाईन अर्ज कसा करावा याबाबतीत पुरेशी माहिती नसते. त्यामुळे ते अर्ज तलाठी कार्यालयामध्ये देतात.

हे वाचले का?  तलाठी (Talathi) यांची कर्तव्ये जमीन महसूल अधिनियम १९६६

परंतु अनेक दिवस त्या अर्जांवरती कार्यवाही होत नाही. त्यामुळे ऑफलाइन अर्ज केलेल्या नागरिकाला ती सुविधा उपलब्ध होत नाही. या अर्जाची ऑनलाईन नोंद नसल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांना यावरती कार्यवाही करता येत नाही.

CMEGP मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेमुळे स्वयंरोजगारास मिळतोय आधार !

Talathi ‘ई-हक्क’ प्रणालीद्वारे करता येणार ही कामे:

ई-करार नोंदणी

बोजा चढविणे/गहाणखत तयार करणे

बोजा कमी करणे

वारसा नोंदणी

मयत कुटुंबातील वारसा नोंदणी

अज्ञान पालनकर्ता शेरा कमी करणे

विश्वस्तांची नावे बदलणे

एकत्र कुटुंब व्यवस्थापक नोंदणी कमी करणे

खातेदारांची माहिती भरणे

हस्तलिखित व संगणीकृत तफावत संदर्भातील अर्ज

मृत व्यक्तीचे नाव कमी करणे

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?  Maharashtra Cabinet Meeting राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वपूर्ण निर्णय |

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top