Vishwakarma Scheme गावकारागिरांना उभारी देणारी विश्वकर्मा योजना…!! कमी व्याजदरात मिळणार 3 लाख रुपयांचे कर्ज |

किती कर्ज मिळेल?

जर व्यक्तीकडे पारंपरिक कौशल्य असेल तर पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्जाची सुविधा उपलब्ध असेल.

या योजनेअंतर्गत ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते.

पहिल्या टप्प्यात व्यवसाय सुरू करण्यासाठी १ लाख रुपयांचे कर्ज दिले जाते.

यानंतर व्यवसाय विस्तारासाठी दुसऱ्या टप्प्यात २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध आहे.

हे कर्ज फक्त ५ टक्के व्याजदराने मिळेल.

अर्ज कसा करायचा?

  1. सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट pmvishwakarma.gov.in वर जा.
  2. येथे Apply Online लिंकवर क्लिक करा.
  3. पीएम विश्वकर्मा योजनेत नोंदणी करा.
  4. नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तुमच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे येईल.
  5. यानंतर, नोंदणी फॉर्म पूर्णपणे वाचा आणि तो पूर्णपणे भरा.
  6. भरलेल्या फॉर्मसह सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करा आणि अपलोड करावे.

या विश्वकर्मा योजनेतून अधिकाधिक लोकांना आपल्या व्यवसायात गतिशीलता आणण्यासाठी मदत होणार आहे. व्यवसायाला  लागणाऱ्या अत्याधुनिक मशीन त्याअनुषंगाने लागणाऱ्या गोष्टी यातून करता येणार आहेत. ही नवी उभारी घेण्यासाठी एक उत्तम पर्याय सरकारने निर्माण करून दिला आहे. त्यासाठी तात्काळ नोंदणी करा, यासाठी योजनेसाठी जिल्हा स्तरावर श्री. चिंतामणी गुट्टे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांची नियुक्तीही केली आहे.त्यांचा संपर्क क्रमांक : मो. 9421859777, कार्यालय : 02382-220144 तसेच सुविधा केंद्राचे राहुल राऊत संपर्क क्रमांक : 9545226622  आपणास अधिक विचारपूस करायची असेल तर वरील क्रमांकावर करता येईल. अधिकाधिक लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top