Vishwakarma Yojana बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा योजना

Vishwakarma Yojana योजनेचे लाभार्थी

या योजनेअंतर्गत सर्व नोंदित सक्रिय (जिवित) बांधकाम कामगार तसेच, त्यांच्या कुटुंबामधील पती अथवा पत्नी व १० वर्षावरील प्रथम दोन अपत्ये ही लाभार्थी म्हणून गणण्यात येतील. या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांच्या सक्रिय (जिवित) नोंदणी कालावधीमध्ये वर्षातून एकदा या योजनेच्या लाभासाठी लाभार्थी पात्र राहील.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक २८ जुलै २०२३ रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार नोंदीत सक्रिय (जिवित) बांधकाम कामगार अथवा त्याच्या कुटुंबातील पात्र व्यक्तींनी आरोग्य योजनेचा लाभ घेतला असल्यास त्यांना शासकीय योजनेची द्विरुक्ती टाळण्यासाठी या योजनेचा लाभ मिळणार नाही.

मात्र, त्या बांधकाम कामगाराचा अथवा कुटुंबातील पात्र लाभार्थ्यांच्या उपचारावरील खर्च 5 लाख रूपयापेक्षा अधिक होणार असल्यास या योजनेच्या खर्चाच्या मर्यादेत नियुक्त संस्थेने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सहमतीने सूचीबद्ध केलेल्या रुग्णालयांमार्फत उपचाराकरीता लाभार्थी पात्र राहील. ही योजना मंडळाकडे नोंदित सक्रिय (जिवित) बांधकाम कामगारांकरीता ऐच्छिक स्वरूपाची राहील.

ही योजना प्राथमिक आरोग्य तपासणी चाचणी, प्रगत पुष्ठीकरण आरोग्य तपासणी चाचणी व वैद्यकीय उपचार या तीन टप्प्यामध्ये राबविण्यात येईल.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत नोंदित सक्रिय (जिवित) बांधकाम कामगार यांच्याकरीता “तपासणी ते उपचार आरोग्य योजना” राबविण्याकरीता एच.एल. एल. लाईफकेअर. लि. (भारत सरकार उद्योग) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अपघात प्रकरणी वैद्यकीय सहाय्य

बांधकामाच्या ठिकाणी नोंदित सक्रिय (जिवित) बांधकाम कामगारास अपघात झाल्यास ती व्यक्ती या योजनेंतर्गत उपचारास पात्र राहील. बांधकाम कामगारास आवश्यकतेनुसार व सोईनुसार ज्या रूग्णालयामध्ये उपचाराकरीता भरती केले असेल, असे रूग्णालय खाजगी असल्यास तात्पुरत्या स्वरूपात सूचीबध्द करून पुढील उपचार नियुक्त संस्था करेल. अपघातानंतर उपचाराकरीता असलेल्या रुग्णालयांची माहिती लाभार्थी / कामाची आस्थापना / नातेवाईक / इतर व्यक्तींनी नियुक्त संस्थेस टोल फ्री क्रमांकावर अथवा जिल्हा / तालुका कामगार सुविधा केंद्रास देणे आवश्यक राहील.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top