Loan Guarantor कर्जासाठी जामीनदार होताय..? जरा सांभाळून, नाहीतर वाढेल डोकेदुखी |

Loan Guarantor

Loan Guarantor वाढती महागाई आणि लोकांच्या वाढणाऱ्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना काही गोष्टींसाठी कर्जाची आवश्यकता भासते. एखाद्या बँकेकडून कर्ज घेतले जाते, ज्यावेळी कर्ज घ्यायचे असते. त्यावेळेस कर्ज घेण्यासाठी जामीनदाराची आवश्यकता असते. एखाद्या व्यक्तीच्या कर्जासाठी जामीनदार व्हायचे असेल, तर अनेक नियमांचे पालन हे करावे लागते.

जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला कर्जाचे जामीनदार झाले, तर तुम्हाला अनेक कागदपत्रांवरती सही करावी लागेल. त्यामुळेच कर्जाचा जामीनदार होणे ही एक केवळ औपचारिकता नाही. एखाद्या वेळेस जर कर्ज घेणारी व्यक्ती ही कर्ज फेडू शकली नाही, तर अशा वेळेस जामीनदार म्हणून तुम्हाला ज्या बँकेकडून कर्ज घेतले आहे त्या बँकेकडून नोटीस येऊ शकते.

Health Insurance Policy Portability जाणून घेऊ या एक विमा कंपनीकडून दुसऱ्या कंपनीमध्ये आरोग्य विमा बदलण्याचे फायदे- नुकसान..!

तुम्हाला जर तुमचा एखादा मित्र किंवा एखादे नातेवाईक कर्जासाठी जामीनदार बनण्यास सांगत असेल, तर अशा वेळेस तुम्ही तुमच्यावर कसा परिणाम होईल, याची कोणतीही काळजी न करता जर हमी भराल, तर अशा वेळेस तुमचे संबंध खराब होण्याची शक्यता असते. परंतु तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे की, ज्या व्यक्तीसाठी कर्ज जामीनदार झाला आहात, त्याचा तुमच्यावर म्हणजेच कर्जाच्या जामीनदारावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कर्जाचा जामीनदार झाल्यानंतर तुमची जबाबदारी काय असू शकते, हे समजून घेणे आवश्यक आहे.

हे वाचले का?  Home Loan Schemes गृहकर्जावर करता येणार मोठी बचत | या योजनांवर सरकार देत आहे अनुदान |

Maratha Karja Yojana अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजनेबद्दल संपूर्ण माहिती: पहा अर्ज, पात्रता व आवश्यक कागदपत्रे…

कर्जासाठी जामीनदार(Loan Guarantor) कधी आवश्यक असतो

  • ज्यावेळी बँकेला वाटते की कर्ज चुकण्याचा धोका असू शकतो किंवा त्यावेळी कर्जाची रक्कम ही जास्त असते.
  • कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोर हा खराब असेल किंवा कर्ज घेणारी व्यक्ती ही त्याची सर्व कागदपत्रे बँकेकडे जमा करू शकत नसेल, अशा परिस्थितीत जामीनदाराची आवश्यकता भासते.
  • जर समजा कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे वय हे जास्त असेल, तर अशावेळी जामीनदाराची गरज असते.
  • ज्यावेळी कर्जाचे जामीनदार असण्याची अट ही बँकेच्या पॉलिसी मध्ये असते, त्यावेळी जामीनदाराची आवश्यकता असते.

Joint Home Loan With Wife पत्नी सोबत गृहकर्ज(Joint Home Loan) घेण्याचे हे आहेत फायदे..!!

कर्ज जामीनदाराची जबाबदारी काय असते?

  • बँक‌ कर्ज घेताना कर्जदाराला काही कागदपत्रांवर ती सही करायला सांगते. त्यानंतर कर्जाची परतफेड करण्याची कायदेशीर जबाबदारी ही कर्ज जामीनदाराची असते.
  • जर कर्जदार हा कर्जाची परतफेड करू शकत नसेल, तर बँक जामीनदाराला देखील नोटीस पाठवू शकते. विशेष करून ज्यावेळी कर्जदाराकडून बँकेने दिलेल्या नोटीसला प्रतिसाद मिळत नाही.
  • ज्यावेळी कर्जदार हा कर्जाची परतफेड करू शकत नसेल, त्यावेळी त्याच्या कर्जाचा भार हा कर्ज जमीनदारावरती पडू शकतो.
  • तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला कर्जासाठी जामीनदार बनले आहात, तर तुम्ही सहज मागे हटू शकत नाही. म्हणजेच तुम्हाला तुमची जबाबदारी टाळता येणार नाही.
हे वाचले का?  Pre Approved Loan प्रीअप्रुव्हड लोन घेणे किती सुरक्षित आहे?

Post Office Schemes ह्या आहेत पोस्ट ऑफिसच्या सर्वोत्तम 5 बचत योजना!!!

सिबिल स्कोर वर देखील परिणाम:

कर्जाची परतफेड करण्यात यशस्वी झाल्यास किंवा तुम्ही ज्या व्यक्तीचे कर्जासाठी जामीनदार झाला आहात, त्या व्यक्तीचे डिफॉल्टर असल्याचा परिणाम हा तुमच्या सिबिल स्कोर वर देखील होईल.

याचा परिणाम तुम्हाला तेव्हा दिसून येईल, जेव्हा तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल, परंतु कर्ज मिळू शकणार नाही.

जामीनदार(Loan Guarantor) होताना लक्षात ठेवा या गोष्टी:

  • तुम्ही एखाद्या व्यक्तीला कर्जासाठी जामीनदार होत असाल, तर सर्वप्रथम हे समजून घ्या की ती व्यक्ती कर्जाची परतफेड करण्यासाठी सक्षम आहे.
  • जर कोणी तुम्हाला कर्जासाठी जामीनदार व्हायला सांगत असेल, तर त्या व्यक्तीला तुम्ही विमा पॉलिसीचे संरक्षण घेण्याचा सल्ला द्या.
  • जर त्या व्यक्तीने कर्जाची परतफेड केली नाही, तर अशावेळी कर्ज परतफेड करण्याचे जबाबदारी ही विमा कंपनीची असेल.
हे वाचले का?  Home Loan गृह कर्ज घ्यायचे आहे, तर हे नियोजन करा....

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

1 thought on “Loan Guarantor कर्जासाठी जामीनदार होताय..? जरा सांभाळून, नाहीतर वाढेल डोकेदुखी |”

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top