1 rupee pik vima yojana  1 रुपया पीक विमा योजनेसाठी अर्ज करत आहात.. ? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा |

1 rupee pik vima yojana

1 rupee pik vima yojana प्रधानमंत्री पीक विमा योजना 2016 च्या खरीप हंगामपासून महाराष्ट्रामध्ये राबविण्यात येते. या योजनेमध्ये महाराष्ट्र सरकारने मोठा बदल केला. या बदलानुसार महाराष्ट्रामध्ये सर्व समावेशक पीक विमा योजना राबविण्यात येते.

शेतकऱ्यांना या अनुसार एक रुपयामध्ये पीक विम्यासाठी अर्ज करता येतो. खरीप हंगाम 2024 साठी अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवून 31 जुलै 2024 पर्यंत करण्यात आली आहे.

पीक विमा योजनेमध्ये सहभागी होताना शेतकऱ्यांना काही गोष्टी माहीती असणे आवश्यक आहे. आपण जाणून घेणार आहोत की, शेतकऱ्यांना कोणत्या गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे.

लेख शेवटपर्यन्त वाचा व आवडल्यास शेअर नक्की करा.

आधार कार्ड व सातबारा उताऱ्यावरील नावात अल्प बदल असेल तरी विमा अर्ज स्वीकारणार |

1 rupee pik vima yojana पीक विमा भरताना या गोष्टी लक्षात ठेवा:

सर्व कागदपत्रांवर सारखेच नाव असायला हवे:

ज्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत सहभाग नोंदवायचा आहे आशा शेतकऱ्यांच्या आधार कार्ड, बँक खाते आणि सातबारा उताऱ्यावर असलेले नाव सारखे असणे आवश्यक आहे.

हे वाचले का?  महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सन 2022-23 सादर जनतेला काय मिळाले? 

आधार कार्ड आणि बँक खात्यामध्ये बहुतेक नाव सारखी आस. परंतु सातबारा उताऱ्यावर नावामध्ये किरकोळ बदल असतो. असे असेल तरीही पीक विमा अर्ज भरताना कोणती अडचण नाही. नावामध्ये थोडाफार बदल असेल तर चालेल परंतु पूर्णनाव आडनाव वेगळे असेल तर फॉर्म भरण्यास अडचण येईल.

ज्या शेतकऱ्यांच्या नावांमध्ये बदल असेल अशा नावांमध्ये असलेला बदल हा अभिमान कंपनी मार्फत तपासला जाईल आणि त्यानंतर अर्ज स्वीकारण्याबाबत पुढची कार्यवाही केली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी गोंधळून जाऊ नये, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

अर्ज करण्यासाठी किती पैसे आवश्यक आहेत? 

सर्वसमावेशक पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकरी स्वतः ऑनलाईन अर्ज करू शकतात. त्यासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेची जी अधिकृत वेबसाईट आहे त्यावर ती जाऊन ऑनलाईन अर्ज करता येतो.

हे वाचले का?  Department of Women and Child Development महिला व बालविकास विभाग तर्फे ‘शासन आपल्या दारी’ अंतर्गत राबविल्या जातात विविध योजना |

याशिवाय सीएससी सेंटरच्या माध्यमातून शेतकरी पिक विमा अर्ज करू शकतात. सीएससी केंद्रावर शेतकरी अर्ज केवळ एक रुपया देऊन अर्ज भरू शकतात. विमा कंपनीकडून सीएससी चालकांना प्रति शेतकरी चाळीस रुपये शुल्क देण्यात येणार आहे. परंतु अर्ज भरण्यासाठी लागणारा सातबारा उतारा व आठ अ चा उतारा शेतकऱ्यांनी स्वतःबरोबर घेऊन जाणे अपेक्षित आहे.

सातबारा उतारासाठी पंधरा रुपये तर आठ उतारासाठी पंधरा रुपये एवढे शुल्क लागते. अर्ज करताना शेतकऱ्याने आधार कार्ड, बँक पासबुक फोटो, पिक पेऱ्याची घोषणापत्र सोबत बाळगणे आवश्यक आहेत.

अधिकचे पैसे मागितल्यास तक्रार कुठे करावी?

जर सीएससी चालकांनी अतिरिक्त शुल्क ची मागणी केली तर याबाबतची तक्रार नोंदवता येते. त्यासाठी कृषी विभागाकडून संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिलेले आहेत.

टोल फ्री क्रमांक :- 14599/14447

व्हाट्सअप क्रमांक :- 9082698142

पिक विमा साठी पीक नोंदवताना कोणती काळजी घ्यावी 

शेतामध्ये लागवड केलेल्या पिकाचा आणि लागवड असलेले क्षेत्राचा शेतकऱ्यांनी विमा उतरवावा ज्या पिकावर विमा घेतला आहे डीपी प्रत्यक्ष शेतामध्ये आढळले नाही तर त्या शेतकऱ्याचा विमा अर्ज नामंजूर करण्यात येईल

हे वाचले का?  Pik Vima Update आंबा, काजू, संत्रा फळपिकांसह ज्वारीचा पीकविमा ४ व ५ डिसेंबर रोजी भरता येणार

आपल्या पिकाची ईपीक पाहणी शेतकऱ्यांनी ऑगस्ट 24 अखेरपर्यंत पूर्ण करावे ही पिक पाहणी मध्ये शेतामध्ये जे पीक शेतकऱ्यांनी नोंदवले ते विमा(1 rupee pik vima yojana) साठी ग्राह्य धरण्यात येईल 1 rupee pik vima yojana

अर्ज केला म्हणजे विमा साठी पात्र ठरले असे होत नाही, कारण….

ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी अर्ज केला याचा अर्थ असे शेतकरी लाभासाठी पात्र ठरले असे होत नाही. जर शेतकऱ्याचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले तर 72 तासांच्या आत  नुकसानीची माहिती विमा कंपनीला देणे आवश्यक आहे.

त्यानंतर विमा कंपनी आणि सरकारी अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करून विमा योजनेच्या नियमानुसार शेतकरी लाभार्थी म्हणून पात्र आहे की नाही हे ठरवतील आणि मगच शेतकऱ्यास नुकसान भरपाई दिली जाईल.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top