Fal Pik Vima Yojana 2023 फळपीक विमा २०२३ अर्ज सुरू.…असा करा अर्ज……

Fal Pik Vima Yojana 2023

Fal Pik Vima Yojana 2023 केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी फळ पिक विमा योजना राबविण्यात येते. यामध्ये मृग बहार व आंबिया बहार अशा दोन ऋतूंसाठी शेतकऱ्यांना पिक विमा दिला जातो.

महाराष्ट्र राज्यातील 26 जिल्ह्यामधील फळबागांना हवामान आधारित विमा योजना लागू करण्यात आलेली आहे. मृगबहरासाठी म्हणजेच खरीप फळ पिक विमा योजनेसाठी सुरुवात झालेली आहे. या योजनेत नाव नोंदवण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.

प्रति हेक्टरी भरावा लागणार एवढा हप्ता

Fal Pik Vima Yojana 2023 फळपीक विमा योजना

भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. आपल्या कृषी क्षेत्राच्या उत्पन्न वाढीमध्ये फळ पिकांचा मोठा सहभाग आहे. फळ पिकांची मागणी चांगली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न जरी मिळाले, तरी नैसर्गिक आपत्ती किंवा इतर अन्य कारणांमुळे फळ पिकांचे नुकसान होते. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू शकतो. ही गोष्ट विचारात घेऊन शेतकऱ्यांच्या फळ पिकांना हवामान, नैसर्गिक धोका, अवकाळी पाऊस या गोष्टींपासून संरक्षण मिळावं, यासाठी राज्यात फळ पिक विमा योजना सुरू करण्यात आलेली आहे.

हे वाचले का?  Madh Kendra Yojana मधकेंद्र योजना : सरकार देणार 50% अनुदान | शेतकरी व बेरोजगारांना रोजगाराची नवी संधी |

2023-24 या वर्षासाठी फळबागांना हवामान आधारित विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. यामध्ये ज्या कर्जदार शेतकऱ्यांना विमा नको आहे, अशा प्रकारच्या शेतकऱ्यांना घोषणापत्र द्यावे लागेल. अन्यथा त्या शेतकऱ्यांचा विमा हप्ता परस्पर कापला जाणार आहे. फळबाग विमा योजनेमध्ये संत्रा, मोसंबी, चिकू, डाळिंब, पेरू, द्राक्ष, सिताफळ, लिंबू इत्यादी फळ पिकांचा समावेश आहे

येथे पहा फळपिक विमा योजना आवश्यक कागदपत्रे

फळपिक विमा योजनेची मुख्य उद्दिष्ट

  • शेतकऱ्यांना झालेल्या नुकसान भरपाईच्या काही प्रमाणात आर्थिक मदत मिळावी, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. 
  • नैसर्गिक आपत्ती किंवा हवामानातील बदलामुळे शेतकऱ्यांच्या फळ पिकांचे नुकसान झाले, तर त्यांना विमा संरक्षण मिळावे.
  • शेतकऱ्यांना नवीन व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान वापरण्यास प्रोत्साहन देणे.
  • नैसर्गिक आपत्ती आणि हवामान बदलातील कारणांमुळे फळ पिकांचे नुकसान झाल्यास, शेतकरी निराश आणि हतबल होतात. अशा परिस्थितीत फळ पीक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्य राखण्यास मदत होते.
हे वाचले का?  Social Welfare Schemes जाणून घेऊया समाज कल्याण विभागाच्या विविध योजना…..!!

प्रति हेक्टरी भरावा लागणार एवढा हप्ता

येथे पहा फळपिक विमा योजना आवश्यक कागदपत्रे

अर्ज कुठे करावा?

fal pik vima yojana online registration फळपिक विमा योजने अंतर्गत अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या जवळील सीएससी सेंटर, बँक, प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था किंवा आपले सरकार सेवा केंद्र असेल तेथे भेट द्यावी लागेल. तिथे शेतकऱ्यांना फळपिक विमा ऑनलाईन अर्ज भरावा लागेल. तसेच शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर सुद्धा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. fal pik vima yojana apply online

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

हे वाचले का?  Crop Insurance II शेतकरी बांधवांनो, पीक विमा काढलात का? आज शेवटची तारीख |

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top