Aamdar Vikas Nidhi आमदार निधीचा हिशोब मागावा

Aamdar Vikas Nidhi विषयी खालील प्रमाणे माहिती मागावी

आमदार विकास निधीचा हिशेब तपासण्यासाठी माहिती अधिकाराचा नमूना

अर्जावर वरिल बाजूस केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अनुसार अर्ज. (जोडपत्र “अ” नियम ३ पहा )

प्रति,
जनमाहिती अधिकारी
जिल्हाधिकारी कार्यालय
.. ………………- जिल्हा.

१) अर्जदाराचे नांव………………………………………………….
२) अर्जदाराचा पूर्ण पत्ता :………………………………………..
३) माहितीचा विषय……………………….या मतदार संघातील आमदारांच्या विकास निधीची माहिती.
४) माहितीचे वर्णन आणि कालावधी (खालील मुद्याप्रमाणे) ……………… श्री / श्रीमती ………….. यांच्या मतदारसंघातील आमदारांच्या पासून…………. आज तारखेपर्यंतच्या आमदार विकास निधीचा मंजूरी, विकास कामे, खर्च व नियमनाची खालील मुद्येनिहाय माहिती मिळणे बाबत.

अ) आमदार निधीतून कोणकोणती कामे पूर्ण करण्यात आली कोणकोणती कामे चालू आहेत, कोणकोणती कामे प्रस्तावित आहेत. प्रत्येक विकास कामावर किती निधी खर्च झाला आहे,होत असलेल्या खर्च झालेला वर्ष निहाय निधी तसेच न वापरलेला शिल्लक निधी माहिती द्यावी.

ब) आमदार विकास निधीचे प्रत्येक काम कोणत्या ठेकेदारास देण्यात आले होते त्या साठी निविदा मागविलया असल्यास प्रत्येक कामाच्या निविदांचा तुलनात्मक तक्ता द्यावा.

क) आमदार विकास निधी वापर कोणत्या कारणासाठी व कसा करावा या विषयीचे शासनाचे नियम,नियमन, कायदा किवां अद्यादेश यांच्या सत्यप्रती उपलब्ध करुन द्याव्यात.

ड) आमदारांनी विकासकामासाठी विनंती किंवा आदेश दिल्यानंतर काम पूर्ण होईपर्यंत कामाची प्रक्रिया कशी असते. कामाची मंजूरी ते काम पूर्ण होईपर्यतचे निकष काय असतात याची माहिती देण्यात यावी.

ई) आमदार विकास निधीमधून कोणकोणती कामे करावीत याचे काही प्राधान्यकम शासनाने ठरवले असल्यास त्याविषयी माहिती देण्यात यावी.

माहितीचा अधिकार नमुना अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube 

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी नक्की भेट द्या.

हे ही वाचा

व्हिडिओ पाहन्यायासाठी येथे क्लिक करा

Aamdar Vikas Nidhi
error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top