Ambulance चालक करत असलेली लुट आता थांबणार | Ambulance Rate Chart |

Ambulance Rate Chart

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलीग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube 

देशात आणि जगामध्ये कोरणा महामारीच्या च्या दुसऱ्या लाटेने घातलेला धुमाकूळ यामध्ये आता फक्त शहरीच नाही तर ग्रामीण भाग ही भरडून निघत आहे.

अशा वेळेस कोरोना बाधित रुग्णांना हॉस्पिटलमध्ये वेळेवर ने-आण करण्यासाठी सामान्य जनता ही ॲम्बुलन्स म्हणजेच रुग्णवाहिकेची साहाय्याने रुग्णांची ने-आण ही करत असतात.

पण अशा वेळीच रुग्णवाहिकेतून रुग्णांची ने-आण होत असताना काही रुग्णवाहिका मालक ड्रायव्हर हे रुग्णांच्या नातेवाईकांची लूट करतात असे शासनाच्या निदर्शनास आले होते.

याच्या अनेक तक्रारीही प्राप्त झाल्या होत्या. यावर कारवाई करण्यासाठी आता प्रत्येक प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणजेच RTO यांना तसे निर्देश देण्यात आले असून.

आता ॲम्बुलन्स चे दर हे ठरविण्यात आले आहेत ते खालील प्रमाणे आहेत खालील तक्ता सातारा जिल्ह्यासाठी लागू असून.

हे वाचले का?  सहकारी बॅंक संचालक बनण्यासाठी राजकारण्यांना बंदी.

आपल्या जिल्ह्यातील दर पत्रक यांची माहिती घेण्यासाठी आपण आपल्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्याा RTO वेबसाईटला भेट देऊ शकतात तिथे आपलं असे दरपत्रक मिळून जाईल.

१. दरपत्रकात दर्शविलेल्या भाडे दरापेक्षा कमी अथवा मोफत सेवा देता येऊ शकेल. परंतु वरीलप्रमाणे प्रास्तावित केलेल्या भाडेदरापेक्षा जास्त भाडे आकारता येणार नाही.

२. सदर भाडे दरपत्रक सर्व रुग्णवाहिकेच्या आतील बाजूस प्रदर्शित करणे चालक व मालक यांना बंधनकारक करण्यात यावे.

३. 20 कि.मी. च्या पुढे अंतर गेल्यास प्रति कि.मी. भाडे त्या मूळ भाडेदरामध्ये वाढ करुन एकूण भाडेदर ठरविणे.

४. 20 कि.मी. च्या पेक्षा जास्त अंतर कापल्यास परतीचे अंतर सुध्दा विचारात घेऊन भाडेदराची आकारणी करावी.

५. वरील भाडेदर प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, सातारा यांच्या सर्व कार्यक्षेत्रात लागू राहतील.

हे वाचले का?  सरपंच सदस्य यांचे पद रद्द कधी होते?

सातारा जिल्हयातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, उपरोक्त दराव्यतिरिक्त कोणत्याही रुग्णवाहिका चालक / मालक हे जादा भाडेदराची मागणी करत असल्यास उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा यांच्या dyrto.11-mh@gov.in या ई-मेल वर आपली तक्रार नोंद करावी. जेणेकरून सदर रुग्णवाहिकेवर दंडात्मक कारवाई करणे सोईचे होईल.

तसेच सातारा जिल्हयातील रुग्णवाहिका चालक / वाहनधारक यांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, सातारा यांनी निश्चित केलेल्या दरपत्रकाप्रमाणेच दर आकारणी करावी.

निश्चित केलेल्या दरापेक्षा जादा भाडे आकारणी केल्यास कडक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. तसेच सदर भाडे दरपत्रक सर्व रुग्णवाहिकेच्या आतील बाजूस प्रदर्शित करणे चालक व मालक यांना बंधनकारक करण्यात आलेले आहे त्याची अंमलबजावणी न केल्यास कारवाई करण्यात येईल असे निर्देश विनोद चव्हाण उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सातारा यांनी दिले आहेत.

हे वाचले का?  बंदुक लायसन्स कसे बनवावे How to Get Gun License in India Marathi.

आमचे लेख मिळवण्यासाठीफॉलो करा : फेसबुक | टेलीग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube 

परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top