Agreement Sathekhat साठेखत कसे तयार करावे. Agreement to Sale

साठे खत हे किती रुपयांच्या स्टॅम्पवर करावे?

  • यासाठी पहिला सल्ला असा असेल की शक्यतो एग्रीमेंट रजिस्टर करावे, मगच जर तुम्ही एग्रीमेंट रजिस्टर करणार असाल तर प्रॉपर्टी चे स्वरूप, प्रॉपर्टी कोठे स्थित आहे या गोष्टीवरून वेगवेगळ्या ठिकाणच्या प्रॉपर्टी वरून वेगवेगळ्या प्रकारचे स्टॅम्प ठरवले जातात. जसे की महामार्ग लगतच्या प्रॉपर्टी साठी थोडा जास्त स्टॅम्प द्यावा लागतो त्याचप्रमाणे पोट खराब जमिनीसाठी कमी स्टॅम्प ड्युटी द्यावी लागते.

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

  • त्यामुळे असे एग्रीमेंट करण्या अगोदर तुम्ही तुमच्या स्थानिक सह रजिस्टर कार्यालयामध्ये किती स्टेप द्यावा लागेल याबाबत चौकशी करा.
  • सर्वसाधारणपणे स्टॅम्प तुमच्या ठरलेल्या व्यवहाराच्या रकमेवर द्यावा लागतो, त्यावर तुम्हाला 5% स्टॅम्प ड्युटी आणि 1% रजिस्ट्रेशन फी द्यावी लागते. हे स्टॅम्प ड्युटी रजिस्टर अग्रीमेंट साठी ची आहे.
  • समजा तुम्ही काही कारणामुळे तुमचे एग्रीमेंट रजिस्टर करू शकत नसाल तर, तुमच्या जिल्ह्यामध्ये ज्या किमतीचे स्टॅम्पवर असे एग्रीमेंट करणे आवश्यक असेल त्या रकमेच्या स्टॅम्प पेपर वर तुम्हाला हे एग्रीमेंट करणे कायद्याने आवश्यक आहे.
  • सर्वसाधारणपणे 100, 500 किंवा 1,000 रुपये किमतीच्या स्टॅम्पवर असे एग्रीमेंट करणे आवश्यक असते.

सर्वात महत्त्वाचा मुद्दा की जर, एखाद्या व्यक्तीने असे एग्रीमेंट करून दिलेल्या असेल आणि त्यामध्ये ठरलेल्या मुदतीमध्ये खरेदीदस्त करून देत नसेल तर कायद्याने आपणास काय तरतूद दिलेली आहे?

  • यासाठी दोन दृष्टिकोन आहेत त्यातील पहिला म्हणजे ज्या व्यक्तीने प्रॉपर्टी विक्री करण्यासाठी एग्रीमेंट केले आहे ती व्यक्ती त्या एग्रीमेंट मध्ये नमूद केलेल्या अटीवर शर्तींना बांधील राहतात.
  • त्याचबरोबर ते प्रॉपर्टी विकण्यासाठी त्या व्यक्तीने ऍडव्हान्स देखील घेतलेला असतो त्यामुळे हा एक अपराधी कॅटेगरीमध्ये येणारा गुन्हा आहे आणि त्यासाठी त्या व्यक्तीवर FIR दाखल केली जाऊ शकते.
  • त्याचबरोबर झालेल्या एग्रीमेंट ची पालन करून घेण्यासाठी तुम्ही दिवाणी न्यायालयामध्ये स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट या कायद्यान्वये एक दिवाणी दावा दाखल करू शकता, ज्या मध्ये कोर्ट तुम्हाला समोरच्या पार्टीतर्फे झालेला करार पूर्ण करून देतात किंवा समोरच्या पार्टीला तो करार पूर्ण करून देणे आदेश करतात.

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

हा दावा दिवाणी स्वरूपातला असल्याने त्याला एक स्पेसिफिक मुदत कायद्यामध्ये नमूद आहे त्यामुळे या मुदतीबाबत देखील आपण थोडी माहिती घेऊया.

  • एग्रीमेंट करताना आपण जी तारीख खरेदीखत करून घेण्यासाठी दिलेली असते त्या तारखेपासून तीन वर्षाच्या आत तुम्ही हा दिवानी दावा दिवाणी कोर्टामध्ये दाखल करू शकता.
  • परंतु यामध्ये एक अडचणीचा मुद्दा हा देखील आहे की ज्या वेळेस आपण असा एग्रीमेंट वरून म्हणजे साठे खतावरून खरेदीखत करून मिळवण्यासाठी साधावा कोर्टासमोर दाखल करतो त्यावेळेस आपणास आपण खरेदीच्या ठरवलेल्या रकमेवर संपूर्ण कोर्ट फीस स्टॅम्प द्यावा लागतो, त्यामुळे अगोदरच आपण जमीन मालकाला एवढे पैसे दिलेले असतात, तसेच साठे खतासाठी संपूर्ण स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी दिलेली असते, आणि आता दाव्यासाठी देखील खरेदीच्या ठरलेल्या रकमेवर आपणास कोर्ट फी स्टॅम्प द्यावा लागत असल्याने ही सर्व अतिशय खर्चिक बाब होऊन जाते.
  • यावर पर्याय म्हणून काही लोक सर्वात प्रथम जो व्यक्ती खरेदी दस्त करून देत नसेल त्याच्याविरुद्ध कलम 420 अन्वये तसेच अन्य फौजदारी कलमान्वये फौजदारी गुन्हा दाखल करतात, एकदा का या गुन्ह्याचे एफआयआर दाखल झाली की समोरची पार्टी त्या फौजदारी गुन्ह्याला घाबरून जाऊन तुम्हाला ठरवल्याप्रमाणे खरेदी दस्त करून देत असते आणि तुमचा कोर्ट फी स्टॅम्प चा खर्च व दाव्यास लागणारा प्रचंड वेळ सुद्धा वाचतो.
  • परंतु इथे एक गोष्ट ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की, जर अशी व्यक्ती एफ आय आर झाल्यावर देखील तुम्हाला खरेदी दस्त करून देत नसेल तर तुम्ही नक्कीच स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट अन्वये कोर्टासमोर एक दावा दाखल करा त्यामध्ये दिवाणी न्यायालय नक्कीच तुम्हाला खरेदी दस्त करून देतील.

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

समोरच्या पार्टी कोर्टासमोर हजर राहत नसेल किंवा त्यांचे विरुद्ध एकतर्फा दावा चालवण्याचा आदेश झालेला असेल आणि त्या पार्टीकडून कोर्टाने जरी खरेदी दस्त करून घेणे बाबत आदेश दिला तर ती पार्टी असे खरेदी दस्त करून देणे साठी येईल का?

  • ज्या वेळेस त्या पार्टीविरुद्ध कोर्ट एकतर्फा आदेश पारित करत असतात किंवा ती व्यक्ती कोर्टासमोर हजर राहत नसेल तर, कोर्टातर्फे एक अधिकारी कोर्ट नेमतात आणि ते अधिकारी तुम्हाला त्या व्यक्तीच्या वतीने रजिस्टर ऑफिसला हजर राहून खरेदी दस्त करून देतात.

तर अशा प्रकारे आजच्या लेखामध्ये आपण ॲग्रिमेंट म्हणजेच साठी खत कसे करावे आणि एखादी व्यक्ती त्यासाठी खतावरून खरेदी दस्त करून देत नसेल तर काय करावे याबाबत सविस्तर माहिती घेतली आहे.

अशाच वेगवेगळ्या माहितीपर लेखासाठी आमच्या साईटला भेट देत रहा.

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top